एवढ्या संपत्तीची मालकिण आहे ड्रामा क्विन राखी सावंत

एवढ्या प्रॉपर्टीची मालकीण 

एवढ्या संपत्तीची मालकिण आहे ड्रामा क्विन राखी सावंत

मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत प्रत्येक मुद्यावर आपलं मत मांडत असते. मग ते बॉलिवूड असो किंवा राजकीय पार्टी राखी सावंत आपल मत मांडतच असते. प्रत्येक गोष्टीत आपलं मत मांडणारी राखी सावंत बॉलिवूडपासून लांब आहे. आता तिच्याकडे कोणताच सिनेमा नाही पण कुणावरही आरोप करण्यात राखी सर्वात पुढे आहे. आताच तिने तनुश्री दत्ताने राखीवर 10 करोडचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे त्याविरोधात राखीने 50 करोडची केस केली आहे. 

'अग्निचक्र' या सिनेमातून राखीने आपल्या करिअरची सुरूवात केली. तसेच राखीने हिट असे आयटम साँग बॉलिवूडला दिले आहेत. तसेच आपल्या बोलण्यातून ती कायमच मीडियात चर्चेत असते. या बोलण्यापेक्षा ती आपल्या खराब कपड्यांमुळे चर्चेत आहे. राखी रिअॅलिटी शोमध्ये 'राखी का स्वयंवर' या शोमधून 2009 मध्ये लाँच झाली. टोरंटोच्या एका मुलाने तिच्याशी विवाह केला. पण अगदी दुसऱ्या महिन्यातच ते वेगळे झाले. 

राखी सावंतचे वडिल आनंद सावंत हे मुंबई पोलीसमध्ये कॉन्स्टेबल होते. ती मुंबईत आई जयासोबत आली होती. राखीने आपल्या बोल्ड स्टेटमेंटमध्ये ब्रेस्ट डोनेटबद्दल सांगितलं तर सोशल मीडियावर बोल्ड फोटोमुळे चर्चेत राहिली. 

राखीच्या प्रॉपर्टीबद्दल बोलायचं झालं तर तिच्याकडे मुंबईत दोन फ्लॅट आहेत. ज्याची किंमत 11 करोड रुपये आहे. तिच्याकडे 30 करोड रुपयांची संपत्ती आहे. राखीजवळ 21.6 लाख रुपयांची फोर्ड एंडेवर कार देखील आहे. राखीची सर्वाधिक कमाई ही स्टेज परफॉर्मेसमधून येते. तर कायमच आपल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत राहते.