Hrithik Roshan च्या घरी लगीन घाई... गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्याची करतोय तयारी!

घटस्फोटानंतर हृतिक गर्लफ्रेंडसोबत पुन्हा करणार नव्या आयुष्याला सुरूवात!  

Updated: Mar 3, 2022, 10:47 AM IST
Hrithik Roshan च्या घरी लगीन घाई... गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्याची करतोय तयारी! title=

मुंबई : अभिनेता हृतिक रोशन आणि पहिली पत्नी सुझान खान काही वर्षांपूर्वी विभक्त झाले. पण दोघांमध्ये मैत्रीचं नातं कायम आहे. घटस्फोट झाल्यानंतर देखील दोघे मुलांची योग्य काळजी घेताना दिसतात. घटस्फोटानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. आता हृतिकचं नाव अभिनेत्री  सबा आझादसोबत जोडलं जात आहे. अलीकडेच ती हृतिकसोबत (Hrithik Roshan)  एका रेस्टॉरंटच्या बाहेर दिसली होती. 

यादरम्यान ती हृतिकचा हात धरताना दिसली होती. सबा खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे. आता दोघे लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. बॉलीवुडलाइफने दिलेल्या माहितीनुसार हृतिक सबासाठी फार गंभीर आहे. हृतिकने सबाची ओळख देखील कुटुंबासोबत करून दिली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हृतिकच्या कुटुंबासोबत तिचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. लवकरचं सबा आणि हृतिक लग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे. रोशन कुटुंबात लग्नाची तयारी सुरू असल्याचं जवळच्य सूत्रांनी सांगितलं आहे. 

दरम्यान, हृतिक आणि सबाने त्यांच्या नात्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. हृतिक आणि सबा कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर यांच्या छोटेखाणी लग्न सोहळ्याप्रमाणे हृतिक आणि सबा लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण यावर हृतिक आणि सबाने काहीही सांगितलं नाही.