Seema Sajdeh : बॉलिवूड अभिनेता सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी सीमा सजदेह सध्या नेटफ्लिक्सवरील सीरिज 'फॅब्युलस लाइव्ह ऑफ बॉलिवूड वाइव्स' मुळे चर्चेत आहे. या शोमध्ये सीमासोबत महीप कपूर, भावना पांडे आणि नीलम कोठारी दिसत आहेत. त्याचं नवं सीझन सुरु झालं आहे. तर सीमानं सुद्धा मूव्हऑन केलं आहे. तिनं तिच्या रिलेशनशिप स्टेटसला अपडेट केलं आहे आणि त्याविषयी माहिती दिली आहे. सीरिजच्या पहिल्या एपिसोडमध्येच कथीतपणे सीमा सजदेह दिल्लीच्या सोशलाइट कल्याणी साहा चावलासोबत तिच्या सिंगलहुडविषयी चर्चा करत होती. सीमा आणि कल्याणी त्यांच्या त्यांच्या घटस्फोटाविषयी बोलताना दिसतात. त्याशिवाय या सगळ्याचा त्यांच्या मुलांवर कसा परिणाम झाला त्याविषयी सांगितलं.
महीपनं सांगितलं की सीमानं मूव्ह ऑन केलं आहे आणि मुंबईच्या लोअर परेल भागात ती आता शिफ्ट झाली आहे. सीमानं सांगितलं की तिनं बिल्डिंगच्या लॉबी परिसरात एक पेन्टिंग पाहिली जिथे टायगर श्रॉफ राहतो. त्यावर इतर सगळ्या तिला चिडवत म्हणतात की टायगर श्रॉफच्या बिल्डिंगमधअये कोणाला लपून-छपून भेटते. गेल्या सीजनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये सीमा सजदेहनं सांगितलं होतं की ती सोहेल खानशी घटस्फोट घेतल्यानंतर आयुष्यात पुढे जात आहे. तर सीमानं खुलासा केला की आता ती विक्रम आहुजाला डेट करत आहेत. यावेळी ती त्याची भेट तिच्या या टीमशी देखील करुन देते आणि सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे सीमानं सोहेलसाठीच विक्रमसोबतचं नात मोडलं होतं.
हेही वाचा : विजय वर्माला घाबरायच्या महिला; सुनिधी चौहान म्हणाली, 'माझ्या जवळ येऊ नको, मला...'
दरम्यान, ज्या विक्रम आहूजाला सीमा डेट करत होती. तर त्यांचा साखरपुडा देखील झाला होता. पण सीमानं ते नातं मोडलं आणि सोहेल खानशी लग्न करण्यासाठी ती घरातून पळून गेली. सोहेल आणि सीमानं 1998 मध्ये लग्न केलं. त्यांना दोन मुलं असून निर्वान आणि योहान खान अशी त्यांची नावं आहेत. 2022 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सीमा ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. 'फॅब्युलस लाइव्ह ऑफ बॉलिवूड वाइव्स' या नेटफ्लिक्सवरील सीरिजमुळे सीमाविषयी सगळ्यांना कळलं आणि त्यानंतर तिच्या चाहत्यांची संख्या देखील वाढू लागली.
LIVE|
IND
26/2(4 ov)
|
VS |
SA
|
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 201/9
|
VS |
MAS
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 201/9
|
VS |
PHI
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 80/9
|
VS |
INA
81/5(16.2 ov)
|
| Indonesia beat Thailand by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.