सुष्मिता सेनसोबत रॅम्पवर झकळलेली प्रसिद्ध मॉडेल आज रस्त्यावर मागतेय भीक

भीक मागताना दिसली.

Updated: Nov 30, 2021, 06:51 PM IST
 सुष्मिता सेनसोबत रॅम्पवर झकळलेली प्रसिद्ध मॉडेल आज रस्त्यावर मागतेय भीक

मुंबई : आजची वेळ अशी आली आहे की, प्रत्येकाला आपल्या जीवनात यशस्वी व्हायचे असते आणि तेच यश मिळवण्यासाठी तो काहीही करू शकतो, परंतु यश हे केवळ मेहनतीच्या जोरावरच मिळते, म्हणून आज या पद्धतीची काही उदाहरणे आपल्यासमोर आहेत.

ज्यांनी कष्ट करूनही आयुष्यात मोठे यश संपादन केले आहे, तर काही लोक असे आहेत ज्यांनी आपले आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त होताना पाहिले आहे. 

असाच काहीसा प्रकार एका मॉडेलसोबत घडला आहे. मॉडेल गीतांजली नागपाल, जिने माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन सोबत रॅम्प वर वॉक देखील केला होता, त्यानंतर तिला खूप वेगाने प्रसिद्धी मिळाली आणि तिच्या सौंदर्याची देशभर चर्चा झाली.

खूप काही करता येत असताना गीतांजलीला काम मिळणं बंद झालं आणि अचानक एके दिवशी ही मॉडेल दिल्लीच्या रस्त्यावर भीक मागताना दिसली.

 नव्वदच्या दशकात गीतांजली नागपाल हे मॉडेलिंग जगतात एक मोठे नाव होते, तिने सुष्मिता सेनसोबत रॅम्प वॉक केला आहे, तर हरियाणाच्या हिसार येथून येणारी गीतांजली ही एका नेव्ही ऑफिसरची मुलगी होती. 

श्री राम कॉलेज मधून तिने ग्रॅज्युएशन केले. तिने तिचा अभ्यास पूर्ण केला, ती दिसायला खूप सुंदर होती, त्यामुळे तिने फॅशन डिझायनिंगचा कोर्सही केला होता.

मॉडेलिंगच्या दुनियेत नाव कमावल्यानंतर घरच्यांनी नकार देऊनही गीतांजलीने एका जर्मन मुलाशी लग्न केले, जिथून गीतांजलीला मुलगा झाला, पण तिचे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि तिने पतीपासून घटस्फोट घेतला. तिचा पती मुलासोबत जर्मनमध्ये राहतो.

अशा परिस्थितीत गीतांजली गोव्याला गेली होती तिथे तिची एका ब्रिटीश मुलाशी भेट झाली आणि दोघांच्या पहिल्या भेटीनंतर प्रेम झाले आणि नंतर ही मॉडेल दिल्लीतील एका स्वस्त गेस्ट हाऊसमध्ये तिच्या प्रियकरासोबत राहू लागली. गीतांजलीला दारूचे व्यसन, त्यानंतर अचानक ती दिल्लीच्या रस्त्यावर भीक मागताना दिसली.

या काळात गीतांजलीने घरात मोलकरीण म्हणूनही काम केले आहे, तर तिची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की तिला रस्त्यावर आणि उद्यानात रात्र काढावी लागली.

अशा परिस्थितीत, एकदा एका फोटोग्राफरने गीतांजलीला फोटो काढतो असं सांगितलं, तेव्हा तिने एखाद्या प्रसिद्ध मॉडेलप्रमाणे तिचा खांदा खाली करुन पोज द्यायला सुरुवात केली. जेव्हा तिच्याबद्दल फोटोग्राफरने जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गीतांजली कोण आहे हे त्याला कळलं.

त्यानंतर त्या फोटोग्राफरनेही पोलिसांना याची माहिती दिली आणि तिला पोलीस ठाण्यात नेले, त्यानंतर मॉडेलला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि तिच्या व्यसनाने तिचे संपूर्ण करिअर बरबाद केले, आज गीतांजली नागपाल कुठे आहे? याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही.