अंबानी कुटुंबात लगीनघाई, करोडपतीच्या मुलीसोबत जुळणार नातं

लवकरच दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार

Updated: Nov 30, 2021, 06:06 PM IST
 अंबानी कुटुंबात लगीनघाई, करोडपतीच्या मुलीसोबत जुळणार नातं

मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचा नात लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. पण हे लग्न आकाश अंबानी यांचा मुलगा पृथ्वी आकाश अंबानीचं नाही. तर, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक निखिल मेसवानी यांचा मुलगा ईशानचा विवाह आहे.

वास्तविक, निखिल मेसवानी हा मुकेश अंबानींचा पुतण्या आहे. या अर्थाने मुकेश अंबानी आणि ईशान यांच्यात आजोबा-नातूचे नाते होते.

रिअल इस्टेट टायकूनच्या मुलीशी लग्न

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक निखिल मेसवानी यांचा मुलगा इशान याने गायत्री रहेजासोबत या आठवड्यात लॉस एंजेलिस येथे एका समारंभात साखरपुडा केला.

ईशान हा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा नातू आहे. तर गायत्री ही रिअल इस्टेट टायकून संदीप रहेजा यांची मुलगी आहे.

मुकेश अंबानी के पोते ने बचपन की दोस्त गायत्री से की सगाई। देखें तस्वीरें...  - Newstrend

नीता आणि ईशा एंगेजमेंट सोहळ्यात सहभागी 

23 नोव्हेंबरला लॉस एंजेलिसमध्ये एंगेजमेंट सोहळा पार पडला. त्यात केवळ कुटुंबीयच सहभागी झाले होते.

मेसवानी आणि रहेजा कुटुंबाव्यतिरिक्त, नीता अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा अंबानी देखील या हाय-प्रोफाईल सोहळ्याला उपस्थित होत्या. ईशानच्या आईचे नाव एलेना मेसवानी आहे तर गायत्रीच्या आईचे नाव दुर्गा रहेजा आहे.

ईशान आणि गायत्री हे बालपणीचे मित्र 

ईशान आणि गायत्री लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. लवकरच दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, इशानचा अंगठी घातलेला एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे