मुंबई : लता मंगेशकरांच्या निधनानंतर पहिल्यांदाच मंगेशकर कुटुंबियांच्या प्रतिक्रिया समोर आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित श्रद्धांजली कार्यक्रम मुंबईतील रूईया कॉलेजमध्ये ठेवला गेला होता. यावेळी मंगेशकर कुटुंबाच्या रेकॉर्डेड रिअॅक्शन कार्यक्रमात दाखवण्यात आल्या.
यावेळी आदिनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर आणि ह्रदयनाथ मंगेशकर यांनी लतादिदींविषयी आपल्या भावना प्रकट केल्या आहेत.
लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन, अंत्ययात्रा याच्या आयोजनाबद्दल मंगेशकर कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांचे आणि आदित्य ठाकरेंचे आभार मानलेत
ह्रदयनाथ मंगेशकर दीदींविषषी बोलताना भावूक झाले. ते बोलताना म्हणाले, "लतादीदी गेल्यानं संगीत युगांत झालाय. संगीतात सातच स्वर असतात पण, लता हा आठवा स्वर आहे."