पतीला गमावल्यानंतर आईला मिळाली मुलाची साथ, बनली सोशल मीडिया 'स्टार'

प्रथमेशने आपल्या आईलाच आपलं रिल व्हिडिओ पार्टनर बनवत सोशल मीडियवर व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली. बघता बघता या जोडीला नेटकऱ्यांनी डोक्यावर उचलून घेतलं. 

Updated: Jul 23, 2021, 12:00 AM IST
पतीला गमावल्यानंतर आईला मिळाली मुलाची साथ, बनली सोशल मीडिया 'स्टार' title=

मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल झालात, की तुम्ही रातोरात स्टार बनतात असं बोललं जातं. पण त्यासाठी तुमचा कॉनटेन्टदेखील तितकाच हटके असणं गरजेचं असतं.लोकांची पसंती मिळवायची असेल तर तुम्हाला त्यांचं मनं जिंकता आलं पाहिजे. सोशल मीडियावर अनेकजण व्हिडिओ आणि फोटो शेअर करत फॉलोवर्सचं लक्षवेधून घेत असतात.

त्यात आता आई आणि मुलाची एक जोडी सध्या सगळ्यांच्याच पसंतीस उतरते आहे. इंस्टाग्रामवर या आई आणि मुलांच्या जोडीचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. प्रथमेश कदम असं या मुलाचं नाव आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by prathamesh_kadam_ (@_prathamesh_kadam)

प्रथमेशने आपल्या आईलाच आपलं रिल व्हिडिओ पार्टनर बनवत सोशल मीडियवर व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली. बघता बघता या जोडीला नेटकऱ्यांनी डोक्यावर उचलून घेतलं.

आता प्रथमेशची आई सोशल मीडियावर स्टार आई बनली आहे. त्याचा बिनधास्त अंदाज सगळ्यांनाच आवडतो आहे. प्रथमेशच्या बाबांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर प्रज्ञा कदम यांनी संसाराचा गाडा आपल्या खांद्यावर घेत प्रथमेशसोबत आपल्या पुढील प्रवासाला सुरुवात केली.

त्यात त्यांच्या अ‍ॅक्टींगचे आणि डान्सचे व्हिडिओज खूपच व्हायरल होऊ लागले. आता इंस्टाग्रामवर प्रत्येकाला ही स्टार आई हवी हवीशी वाटते आहे. अभिनयासह त्यांना उत्तम डान्स देखील जमतो.