कतरिनाला सोडून विकी कौशलची या अभिनेत्रीसोबत बाईक राईड, व्हिडिओनंतर एकच चर्चा

एका मध्यमवर्गीय कुटुंबातील जोडप्याची भूमिका साकारणार आहेत.

Updated: Dec 27, 2021, 05:11 PM IST
कतरिनाला सोडून विकी कौशलची या अभिनेत्रीसोबत बाईक राईड, व्हिडिओनंतर एकच चर्चा  title=

मुंबई : सारा अली खान अलीकडेच तिच्या 'अतरंगी रे'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. त्याच वेळी, अभिनेता विकी कौशल देखील कतरिना कैफसोबत वैवाहिक जीवनाचा आनंद घेताना दिसत होता.

कतरिनासोबतच्या लग्नानंतर विकीच्या बाईकवर सारा अली खान दिसल्याने हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसला. लीक झालेला हा व्हिडिओ विकीच्या आगामी सिनेमाच्या सेटवरील आहे. लग्नानंतर विकीने शुटींग सुरु केलं आहे.

आता, दोन्ही कलाकारांनी त्यांचा नवीन चित्रपट 'लुका छुपी 2' साठी एकत्र काम करण्यास सुरुवात केली आहे. विकी आणि सारा त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

नुकताच या दोन्ही कलाकारांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विकी बाईक चालवताना दिसत आहे आणि सारा त्याच्या मागे बसलेली दिसत आहे.

विक्की कौशल-सारा अली खान के सेट पर की एक तस्वीर.

विकी कौशल-सारा अली खान हे दोघेही मध्य प्रदेशातील इंदूर शहरात अगदी साध्या लूकमध्ये दिसले. विकीने हिरवा टी-शर्ट आणि मफलर घातला आहे. यावेळी त्याने स्लीव्हलेस जॅकेट परिधान केले आहे.

त्याचबरोबर सारा अली खान पिवळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. या दोन्ही कलाकारांच्या लूकवरून असे म्हणता येईल की ते एका मध्यमवर्गीय कुटुंबातील जोडप्याची भूमिका साकारणार आहेत.

Vicky Kaushal's Pic With Sara Ali Khan On Bike From Indore Shoot Goes Viral  - Filmibeat

सारा अली खान आणि विकी कौशल पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या नव्या जोडीची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

साराला वाटते की विकी हा सध्याच्या काळातील सर्वात साधा कलाकार आहे आणि त्याच्यासोबत काम करणे हा तिच्यासाठी मोठा बहुमान आहे.साराने विकीच्या कामाचं आणि अभिनय कौशलचं विशेष कौतुक केलं आहे.