नाना पाटेकरांनंतर आता कैलाश खेरवर महिला पत्रकाराचे गंभीर आरोप

बॉलिवूडकरांसाठी मोठा धक्का

Updated: Oct 7, 2018, 11:36 AM IST
नाना पाटेकरांनंतर आता कैलाश खेरवर महिला पत्रकाराचे गंभीर आरोप title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये तनुश्री दत्ताच्या #MeToo नंतर आता अनेक महिला समोर येत आहेत. आपल्या सोबत झालेल्या चुकीच्या व्यवहारांबद्दल महिला समोर येत आहेत. बॉलिवूडमध्य़े जेथे अनेक महिला तनुश्रीला सपोर्ट करत आहेत तर काही महिला आपल्या सोबत झालेल्या चुकीच्या वर्तवणुकीबाबत बोलत आहेत. नाना पाटेकर, विकास बहल यांच्या नतंर आता गायक कैलाश खेर यांच्यावर देखील एका महिला पत्रकाराने आरोप केले आहेत.

महिला पत्रकाराचा गंभीर आरोप

महिला पत्रकार संध्या मेनन यांनी सोशल मीडियावर गायक कैलाश खेरबाबत मोठा खुलासा केला आहे. मस्कटमध्ये राहणाऱ्या एका महिला पत्रकाराने हे गंभीर आरोप केले आहे. संध्या मेनन यांनी त्या महिला पत्रकारासोबत चॅटचे काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. ज्यामध्ये कैलाश खेर बाबत तिने म्हटलं की, 'मी कैलाश खेर यांना मस्कटमध्ये एका इंटरव्यूसंदर्भात भेटली होती. तेथे माझ्यासोबत काही महिला होत्या. एक फोटोग्राफर आणि काही पत्रकार देखील होते. मी कैलाश खेर यांच्याजवळ बसली होती. ते बोलत असताना सारखे माझ्या मांडीला हात लावत होते. मी खूप असहज फील करत होती. मी माझ्य़ा बॉसली ही गोष्ट सांगितली. पण त्यांनी हसत ही गोष्ट टाळली. त्यानंतर ग्रुप फोटोसाठी त्यांनी मला बाजुला उभं राहण्यासाठी सांगितलं. पण मी नकार दिला. पण ती गोष्ट मला आजही विसरता येत नाही.'

महिलांनी उठवला आवाज

तनुश्री दत्ता यांनी भारतात #MeToo मूमेंटबाबत एक युद्ध छेडलं आहे. आधी फक्त बॉलिवूड कलाकार समोर येत होते. पण आता प्रत्येक क्षेत्रातून याबाबत आवाज उठवला जात आहे. एका पत्रकाराने जेव्हा नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्यातील वादावर जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा कैलाश खेर चांगलेच भडकले होते. बॉलिवूडमध्ये सध्या या वादावरुन 2 गट पडलेले दिसत आहेत.