प्लास्टिक सर्जरीनंतर अभिनेत्री Rakul Preet पुलमध्ये गेली, आणि...

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यापूर्वी तिच्या प्लास्टिक सर्जरीबद्दल चर्चेत आली होती.

Updated: Oct 14, 2021, 01:05 PM IST
प्लास्टिक सर्जरीनंतर अभिनेत्री Rakul Preet पुलमध्ये गेली, आणि... title=

मुंबई : अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यापूर्वी तिच्या प्लास्टिक सर्जरीबद्दल चर्चेत आली होती. आता तिने इन्स्टाग्रामवर एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे.  हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांचं लक्षवेधून घेणारा आहे. तिने दोन मजेदार बूमरॅंग व्हिडिओ पोस्ट केले आहेत.  'मास्क-फ्री' हॉलिडे इन्जॉय करतानाचा अनुभव तिने शेअर केला आहे.

'वॉटर बेबी' रकुल प्रीत

'वॉटर बेबी' रकुल प्रीत सिंग या दोन्ही व्हिडिओंमध्ये तिचं टोन्ड फिगर दाखवत आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये ती ब्लॅक अँड व्हाइट हॉल्टर नेक स्विमवेअरमध्ये दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये ती पाण्यात पाय टाकून मजा घेत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्कार्लेट टमी कंट्रोल स्विमवेअरमध्ये तिने पूलमध्ये उडी मारली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

रकुलने या व्हिडीओद्वारे तिचा अनुभव शेअर केला आहे. या कोविडला कंटाळून ती आता तिचे पूर्वीचे दिवस आठवत आहे. तिच्या चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी तिच्या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.