हिमेश रेशमियानं या अभिनेत्रीशी केलं गुपचुप लग्न

बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे. 

Updated: May 11, 2018, 05:51 PM IST
हिमेश रेशमियानं या अभिनेत्रीशी केलं गुपचुप लग्न title=

मुंबई : बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे. अभिनेत्री सोनम कपूरचं धुमधडाक्यात लग्न झाल्यानंतर गुरुवारी नेहा धुपियानं अंगद बेदीबरोबर लग्न केलं. नेहा धुपियानंतर आता संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमियानंही लग्न केलं आहे. हिमेशनं टीव्ही अभिनेत्री सोनिया कपूरसोबत लग्न केलं. शुक्रवारी संध्याकाळी या दोघांचं रिसेप्शन असणार आहे. हिमेशचं लग्न काही ठराविक नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं. हिमेश रेशमियाचा मुलगाही या लग्नाला आला होता, अशी माहिती आहे. नवी दिल्लीतल्या एका गुरुद्वारामध्ये हे लग्न झाल्याचं बोललं जातंय.

हिमेश रेशमियाचं दुसरं लग्न

हिमेश रेशमियाचं हे दुसरं लग्न आहे. हिमेशनं त्याची पहिली पत्नी कोमलबरोबर 22 वर्ष संसार केला आणि मग घटस्फोट घेतला. मागच्या वर्षी जूनमध्ये हिमेशचा घटस्फोट झाला होता. हिमेश आणि सोनियामध्ये जवळीक वाढल्यामुळे त्याच पहिलं लग्न मोडल्याच्याही चर्चा आहेत.

सोनिया कपूर टीव्हीमधली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'कैसा ये प्यार है', 'जुगनी चली जलंधर', 'यह बॉस', 'रिमिक्स' यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये तिनं काम केलं आहे. हिमेश आणि सोनिया मागच्या 10 वर्षांपासून डेट करत होते अशा चर्चा आहेत. बॉलीवूड लाईफनं दिलेल्या वृत्तानुसार मेहंदीचा कार्यक्रम दोन दिवस आधी झाला आणि आता शुक्रवारी संध्याकाळी रिसेप्शन होणार आहे.