सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाजच्या आई-वडिलांनी हे काय केलं?

दु:खातून बाहेर पडण्यासाठी आई- वडील करतायत शेहनाजची अशी मदत

Updated: Sep 15, 2021, 12:13 PM IST
सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाजच्या आई-वडिलांनी हे काय केलं?

मुंबई :  टीव्ही इडस्ट्रीचा प्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने जगाचा निरोप घेतला.  ह्रदय विकाराच्या झटक्याने अवघ्या 40व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. सिद्धार्थच्या अचानक जाण्याचा सर्वात मोठा धक्का त्याची गर्लफ्रेन्ड आणि अभिनेत्री शेहनाज गिलला बसला आहे. या मोठ्या धक्क्यातून बाहेर येणं तिच्यासाठी फार कठीण आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाज पूर्णपणे कोलमडली आहे. सिद्धार्थच्या निधनाला 13 दिवस पूर्ण झाले आहेत. पण आजही शेहनाजला या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी तिचे कुटुंब प्रयत्न करत आहेत. 

शेहनाजला धक्क्यातून बाहेर येण्यासाठी तिच्या वडिलांनी हातावर मुलीच्या नावाचा टॅटू काढला आहे. सोशल मीडियावर शेहनाजचे वडिल संतोष गिल यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  व्हिडिओमध्ये शेहनाजचे वडील मुलीसाठी केलेला टॅटू दाखवत आहेत. टॅटूमध्ये शेहनाजच्या नावाच्या बाजूला गुलाबाचं फुल देखील दिसत आहे. 

शेहनाजच्या फॅनपेजवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 'त्यांनी खरंच टॅटू काढला आहे. फार सुंदर टॅटू आहे. कृपया यासाठी त्यांना जज करू नका...' असं देखील कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. सध्या शेहनाजच्या वडिलांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. 

दरम्यान, सिद्धार्थच्या निधनानंतर गर्लफ्रेन्ड म्हणजे अभिनेत्री शेहनाज गिल काय परिस्थिती असेल? याचा विचार सध्या सर्वांच्या मनत येत आहे. आता शेहनाज स्वतःला कशी सावरेल? अशा अनेक चर्चा रंगत आहे. 

दरम्यान; शेहनाजच्या कुशीत सिद्धार्थने अखेरचा श्वासचा घेतला असं सांगितलं जात आहे. यूट्यूब चॅनेल Fifafooz च्या संचालक सरिता सिंह यांचा संपर्क शेहनाजचे वडील संतोष गिल यांच्या सोबत झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितलं, 'शेहनाज सध्या पुर्णपणे कोलमडली आहे. तिने मला सांगितलं सिद्धार्थने माझ्या कुशीत अखेरचा श्वास घेतला. आता मी कशी जगू?...' शेहनाज या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.