मुंबई : इंडियन आयडल फेम अरूणिता कांजिलाल आणि पवनदीपने त्यांच्या गोड आवाजाने चाहत्यांना वेड लावलं आहे. आता अरूणिता-पवणदीपचं नवं गाणं 'सैय्योनी' रिलीज झालं आहे. गायक हिमेश रेशमियाचा एल्बम 'हिमेश के दिल के पास' साठी पवनदीप-अरूणिताने आवाज दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे हे गाणं खुद्द हिमेशने लिहिलं आणि कंम्पोज केलं आहे. सध्या सर्वत्र पवनदीप-अरूणिताच्या नव्या गाण्याची चर्चा आहे.
पवनदीप-अरूणिताच्या नव्या गाण्याला रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. 2021 मधील सर्वात जास्त ट्रेंडिंग जोडी आता गायक हिमेश रेशमियासोबत काम करत आहे. हिमेश लिखीत बोल आणि पवनदीप-अरूणिताच्या आवाजाने चाहत्यांना वेड लावलं आहे.
गाणं प्रदर्शित होताचं अवघ्या काही तासातं 6 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज या गाण्याला मिळाले आहेत. गाण्यामधील पवनदीप-अरूणिता यांच्यात रंगलेली जुगलबंदी चाहत्यांसाठी एक पर्वणी आहे. दोघांच्या रोमांटिक गाण्याचे चाहत्यांचं मन जिंकलं आहे.