लग्नानंतर ऐश्वर्याने अभिषेकला खास गोष्टीसाठी दिली परवानगी

अशी कोणती गोष्ट आहे, ज्यासाठी अभिषेकला घ्यावी लागली ऐश्वर्याची परवानगी  

Updated: Dec 5, 2021, 02:31 PM IST
लग्नानंतर ऐश्वर्याने अभिषेकला खास गोष्टीसाठी दिली परवानगी  title=

मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चन सध्या 'बॉब बिस्वास' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात अभिषेकने एका किलरच्या भूमिकेला न्याय दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अभिषेक नव्या आणि वेगळ्या भूमिका साकारताना दिसत आहे. अभिषेकने साकारलेल्या भूमिका चाहत्यांच्या देखील पसंतीस उतरत आहेत. नुकताचं अभिषेकने त्यांच्या ऍक्टिंग करियरबद्दल अनेक खुलासे केले. 

यावेळी अभिषेकने सर्वात जास्त महत्त्व पत्नी ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्या बच्चनला दिलं. 'आज मी जे काही करू शकलो ते फक्त आणि फक्त ऐश्वर्या आणि आराध्यामुळे...' अभिनयात ऐश्वर्या आणि आराध्याचा महत्त्वाचा वाटा असल्याचं अभिषेक बच्चन सांगितलं. 

वडील झाल्यामुळे तो एक जबाबदार आणि विचारी अभिनेता बनला असं देखील अभिषेक म्हणाला. 'लग्नानंतर ऐश्वर्याने मला काम करण्याची परवानगी दिली. ऐश्वर्या म्हणाली तू काम कर. मी आराध्याची काळजी घेईन. यावेळी अभिषेकने ऐश्वर्यासह महिलांचे आभार मानले. 

अभिषेक म्हणाला, ऐश्वर्याप्रमाणेच माहित नाही किती महिला आहेत, ज्यांनी आपल्या पती आणि मुलांना जास्त वेळ दिला. याबद्दल आपण सर्वांनी महिलांचे आभार मानले पाहिजेत. यासोबतच जबाबदारीही वाटून घेतली पाहिजे.

आराध्या निराश होईल असं काही करणार नाही...
मी आता असा कोणताही सिनेमा करणार नाही, ज्यामुळे आराध्या निराश होईल. कोणताही सिनेमा करण्याआधी मी ऐश्वर्या आणि आराध्याचा विचार करेल.. असं देखील अभिषेक यावेळी म्हणाला.