अर्जून कपूरकडून मलायकाचा तो व्हिडिओ शेअर, बघून बसेल धक्का!

बॉलिवूड स्टार्स अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहेत.

Updated: Dec 5, 2021, 01:54 PM IST
अर्जून कपूरकडून मलायकाचा तो व्हिडिओ शेअर, बघून बसेल धक्का!

मुंबई : बॉलिवूड स्टार्स अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहेत. अशा परिस्थितीत दोघंही आपल्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. यावेळी मलायकाचे बिकिनीमधील एक फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

याचबरोबर अर्जुन कपूरने सायकल चालवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अर्जुन सायकल चालवत असताना एक व्हिडिओ बनवत आहे. तर मलायका त्याच्या मागे येत आहे. व्हिडिओ शेअर करत अर्जुनने लिहिलंय की, "जेव्हा तिला जरा देखील अंदाज नसतो कि, तुम्ही तिचा व्हिडिओ बनवत आहात''

यासोबतच मलायकाचा व्हिडिओ शेअर करत अर्जुन कपूरने लिहिलंय की, "तुम्हाला माहिती नाही की, ती सायकलिंगमध्ये एक्सपर्ट आहे" हे स्पष्टपणे दिसत आहे. मलायका अरोरा खुल्या आकाशाखाली निळ्या पाण्याच्या काठावर सुट्टीचा आनंद घेत आहे. मलायका अरोराचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांना खूप आवडतायेत.

मलायका अरोरा आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहेत. नुकतीच अर्जुन कपूर आणि मलायका यांच्याबद्दल अशी अफवा पसरली जात होती की, दोघेही वेगळे होणार आहेत. पण मालदीवमध्ये एकत्र सुट्टी एन्जॉय करत असताना त्यांनी या गोष्टींना फेटाळून लावलं.

मलायका अरोरा देखील अर्जुनच्या कुटुंबासोबत बराच वेळ घालवते. फॅमिली फंक्शन्सपासून ते सेलिब्रेशनपर्यंत मलायका सामील प्रत्येक कार्यक्रमात त्याच्यासोबत असते. मलायकाच्या ग्लॅमरस लूकचे लाखो चाहते वेडे आहेत. त्यांचे फोटो चाहत्यांना देखील खूप आवडतात.