close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अभिषेक बच्चनचं आता इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंट हॅक, कतरिनाला पाठवला मॅसेज

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचं ट्विटर अकाऊंट हॅक झाला आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 11, 2018, 11:17 AM IST
अभिषेक बच्चनचं आता इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंट हॅक, कतरिनाला पाठवला मॅसेज

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचं ट्विटर अकाऊंट हॅक झाला आहे. 

ट्विटर अकाऊंट पाठोपाठ आता इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंट देखील हॅक झाल्यामुळे अभिषेक बच्चनची डोकेदुखी वाढली आहे. सुरूवातीला ट्विटर अकाऊंट आणि आता हे दोन अकाऊंट हॅक झाले आहेत. अकाऊंट हॅक झाल्यानंतर हॅकरने अगदी धक्कादायक फोटो पोस्ट केले आहेत. 

अभिषेकबरोबर या व्यक्तींचं अकाऊंट हॅक 

यामधील एक फोटो असा आहे की, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन इजरायलचे प्राइम मिनिस्टर बेनंजिम नेतनयाहू यांना बघत आहेत. यासोबतच दुसऱ्या फोटोसह एक कॅप्शन आहे की, आय लव्ह यू कतरिना कैफ, एवढंच नव्हे तर हॅकर्सने पेलेस्तीनच्या झेंड्याचा फोटो देखील घेतला आहे. 

अभिषेक बच्चनच्या अगोदर अनुपम खेर आणि अभिनेत्री निमृत कौरचे ट्विटर अकाऊंट हॅक झालं होतं. त्याचप्रमाणे राज्यसभेतील स्वपनदास गुप्ता आणि भाजप नेता राम माधव यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहेत.