उर्वशी रौतलानंतर ऋषभ पंतच्या आयुष्यात या सुंदरीची एन्ट्री, कोण आहे ती?

ऋषभ पंतच्या आयुष्यातील ती सुंदरी आहे तरी कोण ?  

Updated: Jan 10, 2022, 10:32 AM IST
उर्वशी रौतलानंतर ऋषभ पंतच्या आयुष्यात या सुंदरीची एन्ट्री, कोण आहे ती?  title=

मुंबई : भारतीय क्रिकेटर आणि बॉलिवूड कलाकारांचं कनेक्शन फार जवळचं आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्री क्रिकेट खेळाडूंवर फिदा आहेत. अनेक अभिनेत्री याआधी देखील खेळाडूंसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्या आहेत. काही क्रिकेटर आणि अभिनेत्रींनी लग्न करून त्यांच्या नात्याला नवं वळण दिलं. काही दिवसांपूर्वी फलंदाज ऋषभ पंत आणि अभिनेत्री उर्वशी रौतला यांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा रंगल्या होत्या.  

जिसके लिए ऋषभ पंत ने उर्वशी रौतेला को छोड़ा, जानिए कौन है वो हुस्नपरी

पण ऋषभने एका मुलीसोबत फोटो पोस्ट करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ऋषभ ज्या मुलीसोबत दिसत आहे त्या मुलीचं नाव ईशा नेगी असं आहे. ईशा एक इंटीरियर डिजायनर आहे. 

काली ड्रेस में ईशा

ऋषभ पंतची गर्लफ्रेंड ईशा प्रचंड सुंदर आहे. ती एक व्यवसायिक महिला आहे. ईशा मूळची डेहराडूनची आहे. ईशा नेगी इन्स्टाग्रामवर कायम सक्रिय असते. 

ती अनेकदा तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. तिने शेअर केलेले फोटो चाहत्यांना खूप आवडतात. ईशा नेगीने तिचे शालेय शिक्षण देहरादूनमधील जीसस अँड मेरीमधून पूर्ण केलं आहे.

कॉलेजचे शिक्षण नोएडा येथील एमिटी विद्यापीठातून केले. गेल्या अनेक वर्षांपासून ईशा आणि पंत रिलेशनशिपमध्ये आहेत. 2020 च्या सुरुवातीला ऋषभ पंतने सोशल मीडियावर ईशा नेगीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. 

 

ऋषभ पंत और ईशा नेगी

तेव्हा पंतने ईशावर असलेलं त्याचं प्रेम व्यक्त केलं. ईशा आधील ऋषभ पंतचं नाव बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबतही जोडले गेलं. पण उर्वशीनंतर पंतच्या आयुष्यात ईशाची एन्ट्री झाली आहे.