धडकचा ट्रेलर पाहुन परश्या म्हणतो....

सध्या बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर त्यांच्या आगामी सिनेमा धडकचे जोरदार प्रमोशन करत आहे.

Updated: Jul 12, 2018, 12:27 PM IST
धडकचा ट्रेलर पाहुन परश्या म्हणतो....

मुंबई : सध्या बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर त्यांच्या आगामी सिनेमा धडकचे जोरदार प्रमोशन करत आहे. धडक हा मराठी सुपरडुपर हिट सिनेमा सैराटचा हिंदी रिमेक आहे. काही दिवसांपूर्वीची धडकचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर त्याची गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 

सैराट या मराठी सिनेमात आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत होते. दोघांनीही पर्दापणातच केलेल्या जबरदस्त अभिनयाने सैराटला एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले. त्यामुळे हीच कमाल हिंदीत ही होणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

आकाश म्हणतो...

पण सिनेमा प्रदर्शनापूर्वीच सैराट फेम आकाश ठोसरने यावर प्रतिक्रीया दिली आहे. आकाश म्हणतो, मला सिनेमचा ट्रेलर प्रचंड आवडला आणि सिनेमा पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. मी जान्हवी-ईशानसाठी आनंदी आहे. आणि मला खात्री आहे त्या दोघांनीही उत्तम काम केलं असेल.

लस्ट स्टोरीजमध्ये आकाश

२४ वर्षांचा आकाश ठोसर अगदी ध्यानीमनी नसताना सिनेमात आला आणि स्टार झाला. सैराटमुळे मिळालेल्या प्रेमामुळे तो प्रचंड खूश आणि आभारी आहे. अलिकडेच आकाश नेटफिक्सच्या लस्ट स्टोरीजमध्ये झळकला. त्याबद्दल तो म्हणतो, मला बॉम्बे टॉकीज, गॅंग ऑफ वासेपूर हे सिनेमे फार आवडले. त्यानंतर मला अनुराग कश्यपसोबत काम करायची इच्छा होती. ती संधीही लस्ट स्टोरीजमुळे मिळाली. त्याबद्दल अनुराग कश्यप यांचा आभारी आहे. त्याचबरोबर राधिका आपटेसोबत काम करतानाही खूप मज्जा आली.