लग्नानंतर कतरिनाचा पहिला ख्रिसमस विकीने कसा केला स्पेशल, INSIDE फोटो व्हायरल

 खूप वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.

Updated: Dec 26, 2021, 01:05 PM IST
लग्नानंतर कतरिनाचा पहिला ख्रिसमस विकीने कसा केला स्पेशल, INSIDE फोटो व्हायरल title=

मुंबई : लग्नानंतर विकी आणि कतरिना सतत त्यांचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात. दोघेही आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही ना काही फोटो शेअर करत आहेत. आता ख्रिसमस सेलिब्रेशन सगळीकडे सुरु आहे. विकी आणि कतरिनाचा लग्नानंतरचा हा पहिला ख्रिसमस आहे.

यावेळी विकी कौशलने त्यांच्या चाहत्यांना ख्रिसमसच्या खूप वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. वास्तविक, विकी कौशलने कतरिनाला मिठी मारतानाचा एक फोटो शेअर केला आहे, जो त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

विकी कौशलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. फोटोत विकी त्याची नववधू कतरिनाला मिठी मारताना दिसत आहे.  यावेळी दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Vicky-Katrina Kaif's first Christmas celebration at new home was all things  love. Unseen pics - Movies News

या फोटोतील खास गोष्ट म्हणजे त्याचे कॅप्शन. वास्तविक, फोटो शेअर करताना विक्की कौशलने Merry Christmas'च्या जागी ‘Meri Christmas' असे लिहिले आहे. त्याचबरोबर  चाहतेही कमेंट्सद्वारे या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या पोस्टला अवघ्या काही तासांत लाखो लाईक्स मिळाले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कतरिनासोबत खास ख्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी विकी परदेशातून काम संपवून परत आला होता. नुकताच त्याचा एअरपोर्टवरील व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये तो मुंबई विमानतळावर दिसला होता. लग्नानंतर विकी आणि कतरिना पहिल्यांदा ख्रिसमस एकत्र सेलिब्रेट करत आहे.