सलमान खानला साप चावला, प्रकृती अद्यापही....

प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी दिली मोठी माहिती  

Updated: Dec 26, 2021, 12:23 PM IST
सलमान खानला साप चावला, प्रकृती अद्यापही.... title=

मुंबई : अभिनेता सलमान खानला साप चावला आहे. शनिवारी रात्री पनवेलच्या फार्महाऊसमध्ये सलमानला साप चावला. त्यानंतर त्याला तात्काळ रात्री 3 वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं. काही तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली सलमानला ठेवल्यानंतर त्याला सकाळी 9 वाजता सोडलं. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

पनवेल येथील फार्महाऊसवर रात्री सलमानला साप चावला. बिनविषारी साप असल्याने त्याच्या जीवावर बेतले नाही. उपचार घेवून सकाळी 9 वाजता सलमान खान परत आपल्या फार्महाऊस वर रवाना झाला. सध्या त्याची प्रकृती ठिक आहे.