दीपिका जेव्हा चाहत्याला लिफ्ट देते...

दीपिकाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल

Updated: Jun 25, 2019, 06:18 PM IST
दीपिका जेव्हा चाहत्याला लिफ्ट देते... title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण गेल्या काही दिवसांपासून सतत काही ना काही कारणाने चर्चेत आहे. दीपिकाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत आहेत. आता नुकताच मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वारावर एका सुरक्षाकर्मीने आपल्या कर्तव्याचं पालन करत दीपिकाला तिच्या ओळखपत्राची विचारणा केली होती. दीपिकानेही त्यांचा आदर करत तिचं ओळखपत्र दाखवलं होतं. दीपिकाच्या या व्हिडिओला चाहत्यांची चांगली पसंतीही मिळत होती. आता पुन्हा एकदा दीपिकाचा मुंबई विमानतळावरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये दीपिका मुंबई विमानतळावरुन चेकआऊट करताना दिसत आहे. दीपिका बाहेर येताना एक फोटोग्राफर चाहता दीपिकाचे फोटो काढत होता. त्यावेळी दीपिका त्याला हसत गाडीमध्ये बसण्यासाठी इंवाइट करते. ती फोटोग्राफरला गाडीकडे इशारा करत 'आजा बैठ जा' म्हणत गाडीमध्ये बसण्यासाठी सांगते. एका सेलिब्रिटी फोटोग्राफरने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. १८ तासांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#deepikapadukone invites us for a drive  #airportdiaries #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

दीपिकाने नुकतंच तिच्या आगामी 'छपाक' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. 'छपाक' अॅसिड अॅटॅक पिडिता लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' १० जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात विक्रांत मेसीही दीपिकासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. मुंबई, दिल्लीमध्ये 'छपाक'चं शूटिंग झालं आहे. दीपिका येत्या काळात रणवीर सिंहसोबत '८३' चित्रपटातही भूमिका साकारणार आहे. रणवीर-दीपिकाच्या लग्नानंतर दोघे पहिल्यांदा एकत्र '८३'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.