'अग्निपंख'ची टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

'अग्निपंख' या अग्निशमन दलावरील पहिल्या भारतीय ॲक्शनपटाच्या टीमनं नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

Updated: Aug 26, 2017, 05:40 PM IST
'अग्निपंख'ची टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला title=

मुंबई : 'अग्निपंख' या अग्निशमन दलावरील पहिल्या भारतीय ॲक्शनपटाच्या टीमनं नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी जाऊन निर्मात्या ऋतुजा गायकवाड-बजाज, अनिल गायकवाड आणि अभिजीत गायकवाड यांनी अग्निपंखच्या पहिल्या टीझर पोस्टरची प्रतिमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट दिली. 

आजवर सैन्यदल तसेच पोलीस दलावर आधारित अनेक सिनेमे आले परंतु माध्यमांमध्ये आणि जनमानसात तुलनेनं दुर्लक्षित राहिले आहे. कशाचीही पर्वा न करता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवची बाजी लावून मोहिम फत्ते करणाऱ्या अग्निशमन दलाची शौर्यगाथा भारतात प्रथमच आणि तेही मराठीत येत असल्याचं ऐकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अग्निपंखच्या टीमचे कौतुक केलं.