ऎश्वर्याला एकट्यात भेटायचं होतं या निर्मात्याला

हॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून कास्टिंग काऊच करणा-या निर्मात्यांची पोलखोल केली जात आहे. यात आता निर्माता हर्वी वाइंस्टीन याचंही नाव चर्चेत आहे.

Updated: Oct 13, 2017, 05:11 PM IST
ऎश्वर्याला एकट्यात भेटायचं होतं या निर्मात्याला

मुंबई : हॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून कास्टिंग काऊच करणा-या निर्मात्यांची पोलखोल केली जात आहे. यात आता निर्माता हर्वी वाइंस्टीन याचंही नाव चर्चेत आहे.

अभिनेत्री अ‍ॅन्जेलिना ज्योली आणि ग्विनेथ पालट्रोसारख्या दिग्गज अभिनेत्रींनी हर्वीवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता. हर्वीबाबत आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हर्वीने ऎश्वर्या राय बच्चनला एकट्यात भेटण्याची इच्छा व्यक्ती केली होती. मात्र ऎश्वर्याची माजी मॅनेजर सिमोन शिफिल्डने ही बाब मानण्यास नकार दिला होता. 

रिपोर्टनुसार, सिमोन जेव्हा ऎश्वर्याला घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये एका प्रोजेक्टबाबत बोलण्यासाठी गेली होती. तेव्हा हर्वीने ऎश्वर्याला एकट्यात भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. इतकेच नाही तर त्याने सिमोनवर यासाठी दबाव देखील टाकला होता. त्यानंतर हर्वी भडकला होता. 

सिमोननुसार, हर्वीने त्याच्या मनसारखे न ऎकल्या त्याची किंमत चुकवावी लागेल अशी धमकी सिमोनला दिली होती. तो हेही म्हणाला होता की, यापुढे एकत्र काम करणार नाही. सिमोन म्हणाला की, हर्वीच्या धमक्यांना बळी पडण्याऎवजी मी ऎश्वर्याला घेऊन तेथून बाहेर पडणे योग्य समजले.