नवी दिल्ली : बंगळुरूची राहणारी श्रद्धा शशिधर अमेरिकेत २६ नोव्हेंबरला होत असलेल्या प्रतिष्ठीत ‘मिस यूनिव्हर्स स्पर्धा २०१७’मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे.
अभिनेता शाहिद कपूरने तिला याआधी यामाहा फॅसिनो मिस दीवा आणि मिस यूनिवर्स इंडिया २०१७ चा किताब दिला होता. या स्पर्धेत मिस पेडेन ओंग्मु नामग्याल(सिक्कीम) मिस दीवा सुप्रानॅशनल २०१७ सन्मानित करण्यात आअली. आणि अपेक्षा पोरवाल(मुंबई) मिस दीव २०१७ ची सेकंद रनर-अप बनली. निर्णायक मंडळामध्ये माजी मिस यूनिव्हर्स आणि अभिनेत्री लारा दत्ता, अभिनेता राजकुमार राव, दिग्दर्शक कबीर खान, बॉक्सर विजेंद्र सिंह आणि २०१६ ची मिस यूनिव्हर्स-आयरिस मित्तेनेयरसारखे दिग्गल सहभागी झाले होते.
लारा दत्ता म्हणाली की, ‘हा एक अद्भुत प्रवास राहिला. सर्वच मुली आधीच विजयी आहेत. पण केवळ एकच विजेता असू शकतो. त्यामुळे पॅनेलने १५ पैकी १ विजेत निवडणे कठीण होते’.
श्रद्धा मॉडल आणि अॅथलिट आहे. ती आर्मी फॅमिलीतून आलीये.
श्रद्धाचा जन्म चेन्नईमध्ये झाला. तिचं शालेय शिक्षण आर्मी पब्लिक स्कूल, देओलाली येथून झालं.
तिने सोफिया कॉलेज फॉर वूमनमधून मास कम्युनिकेशनची डिग्री घेतली.
श्रद्धाला संगीत, खेळ आणि अॅडव्हेंचरची आवड आहे. तसेच ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह असते.