मुंबई : बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ऐश्वर्या राय बच्चन जवळपास 12 वर्षांपासून लॉरिअलची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. दरवर्षी ती या ब्रँडच्या वतीने फॅशन वीकचा भाग बनते. अलीकडेच ऐश्वर्या पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली. यावेळी ती चमकदार गोल्डन रंगाच्या डेज्जलिंग गाऊनमध्ये एखाद्या दिवापेक्षा कमी दिसत नव्हती.
स्माईल देत तिने रॅम्पवर एन्ट्री मारली आणइ तिने तिची आवडती 'फ्लाइंग किस' पोज दिली. अमेरिकन सुपरमॉडेल आणि रिअॅलिटी स्टार केंडल जेनरसोबत ती स्टेजवर डान्स करतानाही दिसली. मात्र, तिच्या वाढलेल्या वजनामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोलही झाली आहे.
केंडल जेनरसोबत दिसली थिरकताना
ऐश्वर्या राय बच्चन अमेरिकन सुपरमॉडेल आणि रिअॅलिटी स्टार केंडल जेनरसोबत स्टेजवर डान्स करताना दिसली. याचबरोबर दोघंही एकमेकांशी गप्पाही मारताना दिसल्या. केंडल जेनरने पांढरा चमकदार गाऊन परिधान केला होता.
वजनाबाबत लोकांनी कमेंट्स केल्या
ऐश्वर्या राय बच्चनचा पॅरिस फॅशन वीक लूक सध्या चर्चेत आहे. तिच्या ड्रेस आणि लूकसाठी लोक तिची स्तुती करत असले तरी काही युजर्सनी तिला तिच्या वाढत्या वजनामुळे ट्रोलही केलं आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिलं की, 'ती तिचे पोट का झाकत आहे?' तर दुसऱ्या यूजरने लिहिले- 'तिचं वजन खूपच वाढलं आहे.'
ऐश्वर्या रायने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांनाच वेड लावले आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे आजच्या बॉलीवूडमधील सर्वात प्रेमळ जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांना इंडस्ट्रीचं पॉवर कपल असंही म्हणतात.
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.