'माझं नवऱ्याचं नाव ऐकलं आहे का?', असं का म्हणायची वेळी आली Aishwarya वर

Aishwarya Rai :  ऐश्वर्याचा व्हिडीओ सोशल (Social Media) मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Updated: Sep 24, 2022, 12:32 PM IST
'माझं नवऱ्याचं नाव ऐकलं आहे का?', असं का म्हणायची वेळी आली Aishwarya वर  title=
Aishwarya Rai tell husband name Abhishek and Handsome with brain Beauty with brains video viral on Social Media NM

Aishwarya Rai :  बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Bollywood actress Aishwarya Rai Bachchan) आपल्या सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. खरं तर बॉलिवूड सुपर स्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), जया बच्चन (Jaya Bachchan) असो की अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), ऐश्वर्या राय यांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला चाहते खूप उत्सुक असतात. मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन हिच्या सौंदर्यामुळे अनेक चाहते घायाळ आहेत. ऐश्वर्याला पाहून अनेक जण म्हणतात की, ती ब्युटी विथ ब्रेनचं एक उत्तम उदाहरण आहे. 

ऐश्वर्याची अजून एक ओळख आहे, ती म्हणजे ती हजरजबाबी आहेत. बऱ्याच मुलाखाती आणि फॅशन शोदरम्यान तिने जे प्रश्नांना उत्तरं दिली आहे, ते पाहून उपस्थितांसोबत चाहतेही हैराण झाले आहेत. असाच एक ऐश्वर्याचा व्हिडीओ सोशल (Social Media) मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एका चाहत्याने तिला प्रश्न विचारला त्याने नंतर तिच्या उत्तरानंतर सगळेच निशब्द झालेत.  (Aishwarya Rai tell husband name Abhishek and Handsome with brain Beauty with brains video viral on Social Media NM)

‘ब्युटी विथ ब्रेन’ मग...

या व्हिडीओमध्ये(video) ऐश्वर्याचा चाहता तिला प्रश्न विचारला की 'ब्युटी विथ ब्रेन' (Beauty with brains) असं म्हटलं जातं मग 'हॅण्डसम विथ ब्रेन' (Handsome with brain) असं का म्हटलं जात नाही. यावर तिने दिलेल्या उत्तरानंतर सर्वांनीच टाळ्या वाजवल्या...

हा व्हिडीओ 2015 मधील 'द कपिल शर्मा शो'चा (The Kapil Sharma Show) आहे. यावेळी ऐश्वर्या तिच्या चित्रपट जज्बाच्या (Jazbaa) प्रमोशनसाठी आली होती. त्यावेळी प्रश्नांला उत्तर देताना म्हणाली की, तुम्ही अभिषेक बच्चन यांचं नाव ऐकलं आहे का? तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला होता. तसंच तिच्या हजरजबाबी पणाचं कौतुकही करण्यात आलं होतं.

ऐश्वर्या प्रसिद्ध दिगदर्शक मणिरत्नम (Mani Ratnam) यांच्या पोन्नियिन सेलवन (Ponniyin Selvan) चित्रपटात दिसून येणार आहेत. हा चित्रपट 30 सप्टेंबरला रीलिज होणार आहे. तर अभिषेक ओथ सेरुप्पू साईज 7 (Oththa Seruppu Size 7) च्या हिंदी रिमेकमध्ये दिसून येणार आहे.