Arjun Kapoor नं Anushka Sharma च्या पोस्टवर केली Negative Comment?

अनुष्कानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टवर अर्जुननं ही कमेंट केली आहे. 

Updated: Sep 24, 2022, 12:08 PM IST
Arjun Kapoor नं Anushka Sharma च्या पोस्टवर केली Negative Comment?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनुष्का सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. अनुष्का आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) दोघेही सोशल मीडियावर मस्ती करतात. दोघेही बऱ्याचवेळा एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत एकमेकांची मस्करी करताना दिसतात. यावेळी तर अभिनेता रणवीर सिंगही (Ranveer Singh) अनुष्काच्या पोस्टवर तिची खिल्ली उडवताना दिसला आहे. 

आणखी वाचा : सुकेश चंद्रशेखरनं Jacqueline Fernandez ला..., जॅकलिनच्या स्टायलिशचा धक्कादायक खुलासा

अनुष्कानं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अनुष्कानं ओव्हर साइज हूडी परिधान केलं आहे. त्यावर तिनं मॅच होतील असे शू घातले आहेत. अनुष्कानं फोटो शेअर करत लिहिलं की 'मला एकही फोटो आवडला नाही, मग मला वाटलं की नेहमी चांगला फोटो शेअर करायला हवं, असं कोण म्हणालं? तर हे माझे ok ok टाईपचे फोटो आहेत जे मी शेअर करत नाही पण जर माझ्या अमूल्य श्वासाचा उपयोग करत हे फोटो काढण्यासाठी होत असेल तर ते पोस्ट करावेच लागेल. चला ओके बाय'

आणखी वाचा : 2000 सिम कार्ड्सच्या ड्रेसमुळे Urfi Javed च्या घरी पोहोचले पोलीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेणं योग्य की अयोग्य? 

अनुष्काच्या पोस्टवर कमेंट करत अर्जुन कपूर म्हणाला, हूडी चांगली आहे, पण फोटो वाईट आहेत हे मी मान्य करतो. दुसरीकडे रणवीर सिंगनं कमेंट करत हसायचे इमोजी शेअर केले आहेत.  अनुष्काची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. तर यावर नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट केल्या आहेत. (Arjun Kapoor Comment On Anushka Sharma And Troll Her About Her Look)

आणखी वाचा : 'हा मुलगा मोठा होऊन....', Sonam Kapoor च्या मुलाविषयी मोठी भविष्यवाणी आली समोर

दरम्यान, अनुष्का सध्या तिच्या आगामी 'चकडा एक्सप्रेस' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातून ती बऱ्याच दिवसांनी पुनरागमन करत आहे. हा चित्रपट क्रिकेटर झुलन गोस्वामी यांचा बायोपिक आहे. अनुष्का सगळ्यात शेवटी 2018 मध्ये शाहरुख खान आणि कतरिना कैफ सोबत 'झिरो' चित्रपटात दिसली होती.