भर लग्नात अभिनेत्रीवर दयाबेनचं भूत, पाहा अचानक काय केलं

टीव्ही कलाकार नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा लग्न बंधनात अडकले आहेत. 

Updated: Dec 2, 2021, 01:52 PM IST
भर लग्नात अभिनेत्रीवर दयाबेनचं भूत, पाहा अचानक काय केलं title=

मुंबई : टीव्ही कलाकार नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा लग्न बंधनात अडकले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पण एका व्हिडिओने लोकांचं लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे अभिनेत्रीच्या डान्सने.

अभिनेत्री झाली दयाबेन 
टीव्ही शो 'गुम है किसीके प्यार में' मधील  दिर आणि भाऊजय आणि जुनं कपल विराट आणि पाखी एकत्र आल्याचं भलेही  कोणालाही आवडलं नसेल. सिरियलमध्ये  ही जोडी एकमेकांसोबत दिसली नसली तरी खऱ्या आयुष्यात आता विराट आणि पाखी म्हणजेच नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा एकमेकांचे झाले आहेत. सात फेरे घेऊन दोघांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अभिनेत्री एका व्हिडिओमध्ये दयाबेनसारखा गरबा करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ
टेलिव्हिजन अभिनेता नील भट्ट याने मंगळवारी इंदूरमध्ये ऐश्वर्या शर्मासोबत लग्नगाठ बांधली. त्याने स्वतः ही बातमी इंस्टाग्रामवर सर्वांसोबत शेअर केली आहे. त्याने आपल्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांची रोमँटिक केमिस्ट्री लोकांची मने जिंकत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नील आणि ऐश्वर्याच्या लग्नाचे फोटो पाहिल्यानंतर सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी त्यांना सुखी वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा देत कमेंट करायला सुरुवात केली आहे. अभिनेत्री किशोरी शहाणेने लिहिलंय की, 'सुंदर जोडप्याचं अभिनंदन.. तुम्हा दोघांनाही प्रेम.'  तर एका चाहत्याने लिहिलंय की, 'तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि तुम्हाला सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा.'