संजय राऊत यांच्या घराची रेकी करणारे गुंड नाहीत मग नेमके कोण? गुपित उघड

Sanjay Raut : शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या घराची रेकी करणारे नेमके कोण होते ही बाब आता समोर आली आहे.    

Updated: Dec 21, 2024, 08:08 AM IST
संजय राऊत यांच्या घराची रेकी करणारे गुंड नाहीत मग नेमके कोण? गुपित उघड title=
Mumbai news shivsena uddhav thackeray party mp Sanjay Raut House rekki latest updates

मनोज कुळकर्णी, झी मीडिया, मुंबई : राजकीय वर्तुळात दर दिवशी नव्या घडामोडींना तोंड फुटत असतानाच शुक्रवारी एक धक्कादायक माहिती समोर आली. जिथं शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते, खासदार (Sanjay Raut) संजय राऊत यांच्या घराची अज्ञातांनी रेकी केल्याचं म्हटलं गेलं. हा घातपाताचा कट असल्याचा आरोप खुद्द राऊतांनीही केला. ज्यानंतर पोलीस आणि संरक्षण यंत्रणा सतर्क झाल्या. सरतेशेवटी राऊतांच्या घराची रेकी नेमकी कोणी केली होती यामागचं गुपितही उघड झालं. 

उपलब्ध माहितीनुसार रेकी करणारे 'ते' सेलप्लॅन, इन्स्टा आयसीटी सोल्युशन या कंपनीचे चार कर्मचारी होते. ते ईरिक्सन कंपनीकडून Jio मोबाईल नेटवर्कचे नेटवर्क टेस्ट ड्रायव्ह करत असल्याचं पोलीस चौकशी दरम्यान निष्पन्न झालं. पोलिसांनी तशी संबधीत कंपनीकडून खात्रीसुद्धा केली आहे. 

शुक्रवारी 20 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास विक्रोळी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल राऊत यांचे स्वीय सहाय्यक हितेश पटेल यांनी पोलिसांना फोनद्वारे आमदार सुनिल राऊत यांच्या मैत्री बंगल्यासमोर सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास दोन संशयीत इसम मोटार सायकलवर येऊन त्यांच्या घराची रेकी करुन निघून गेल्याचे कळवलं. त्यांच्या या सदर तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी सदर घटनेची सखोल चौकशी केली. 

हेसुद्धा वाचा : Weather News : उत्तरेकडील पर्वतरांगांवर बर्फाचं अच्छादन; या थंडीचा महाराष्ट्रावर कसा होतोय परिणाम? पाहा सविस्तर वृत्त 

याबाबत मुंबई पोलिसांकडून प्रसिध्दी पत्रक जाहीर केलं आहे. खासदार संजय राऊत हे भांडुप येथील मैत्री बंगल्यात आमदार सुनील राऊत आणि संदीप राऊत यांच्यासह एकाच बंगल्यात राहतात. यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटांकडून त्यांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते त्यावर आता पडदा पडला हे मात्र निश्चित.

दरम्यान, रेकी करण्यात आल्याची माहिती समोर येताच राऊत नेमके कोणाच्या रडारवर आहेत हाच प्रश्न उपस्थित करण्यात आला. राऊतांच्याच्या आरोपांनुसार त्यांच्या दिल्लीतील घर आणि कार्यालयाचीही रेकी करण्यात आली असून, त्यांच्या सामनाच्या कार्यालयाचीसुद्धा रेकी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती इथं समोर आली होती.