अय्यारी सिनेमाची रीलिज डेट बदलली

बॉलिवूड सिनेमांच्या प्रदर्शनासाठी यंदाच्या वर्षाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही.

Updated: Feb 6, 2018, 10:25 PM IST
अय्यारी सिनेमाची रीलिज डेट बदलली  title=

मुंबई : बॉलिवूड सिनेमांच्या प्रदर्शनासाठी यंदाच्या वर्षाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही.

पद्मावतच्या वादामुळे या चित्रपटाला फटका बसला सोबतच इतर  काही चित्रपटांवरही त्याचा परिणाम दिसून आला.  

अनेक चित्रपटाच्या रिलीज डेट बदलल्या 

पद्मावत चित्रपटामुळे पॅडमॅन, परी, अय्यारी यासारख्या अनेक चित्रपटांनी आपल्या रिलीज डेट पुढे ढकलल्या आहेत. आता पॅडमॅनशी होणारी अय्यारीची टक्करदेखील टळणार आहे.  

का बदलली रीलिज डेट  

अय्यारी चित्रपटातील काही सीन्सवर संरक्षण मंत्रालयाने आक्षेप नोंदावला होता. त्यामधील सीन्स काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी अय्यारी 9 फेब्रुवारीला रीलिज होणार होता. मात्र इतक्या कमी दिवसामध्ये चित्रपटामध्ये बदल करून रीलिज करणं शक्य नसल्याने या चित्रपटाची रीलिज डेट बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा चित्रपट 16 फेब्रुवारीला रीलीज होणार आहे. यापूर्वी पद्मावतशी टक्कर टाळण्यासाठी 'अय्यारी'ची रीलिज डेट बदलण्यात आली होती.

 

सिद्धार्थ कपूर आणि मनोज वाजपेयी खास भूमिकेत 

सिद्धार्थ कपूर आणि मनोज वाजपेयी या दोन सैनिक अधिकार्‍यांच्या आयुष्याभोवती या चित्रपटाची कहाणी फिरत आहे. चित्रपटात सिद्धार्थ हा मनोजचा शिष्य दाखवण्यात आला आहे. नीरज पांडेने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.