पुन्हा एकदा अजय -अतुलच्या तालावर नाचणार बॉलिवूड

हा आहे अजय - अतुलचा नवा प्रोजेक्ट 

पुन्हा एकदा अजय -अतुलच्या तालावर नाचणार बॉलिवूड title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या चर्चा आहे ती 'धडक' या सिनेमाच्या संगीताची. मराठमोळ्या अजय - अतुलने मराठी सिनेसृष्टीपाठोपाठ बॉलिवूडला देखील आपल्या तालावर ठेका धरायला भाग पाडलं. 'सैराट' या मराठी ब्लॉकब्लस्टर सिनेमानंतर आता याचा रिमेक येत आहे.  करण जोहर जान्हवी कपूर आणि ईशान खत्तरला घेऊन 'धडक' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या धडक या सिनेमातील गाणी सगळीकडे गाजत आहे. अजय - अतुलच्या संगीताने साता समुद्रापार जाऊन मराठीचा झेंडा अटकेपार लावलाच आहे. पण अजूनही ही जोडी बॉलिवूडला आपल्या तालावर नाचवण्यासाठी सज्ज झाली आहे. चिकनी चमेली या गाण्यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या या जोडीचा नवा बॉलिवूड सिनेमा येत आहे. 

हा आहे नवा प्रोजेक्ट? 

आता पुन्हा एकदा ही जोडी बॉलीवुडच्या रसिकांना वेड लावण्यासाठी येत आहे. 'शमशेरा' या आगामी सिनेमातून रसिकांना पुन्हा एकदा अजय-अतुलच्या संगीताची जादू अनुभवता येणार आहे.यशराज फिल्म्स शमशेरा हा सिनेमा घेऊन येत आहे. करण मल्होत्रा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. कोणत्याही सिनेमाच्या यशात त्या सिनेमाच्या संगीताचं मोलाचं योगदान असतं. त्यामुळेच की काय शमशेरा सिनेमाला संगीत देण्यासाठी आघाडीची संगीतकार जोडी अजय-अतुल या जोडीची निवड करण्यात आली आहे. या सिनेमाच्या संगीताच्या मेकिंगची प्रकिया सुरु असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

शमशेरा सिनेमाचा दिग्दर्शक करण मल्होत्राने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत संगीतकार अजय पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या शमशेरा सिनेमाच्या संगीताच्या मेकिंगची प्रक्रिया सुरु असल्याचे समोर आले आहे. करण आणि अजय अतुल या जोडीने याआधी 'अग्निपथ' या सिनेमात एकत्र काम केले होते. या सिनेमाच्या संगीताने रसिकांवर मोहिनी घातली होती. आता पुन्हा एकदा तशीच जादू अजय अतुलने शमशेरा सिनेमासाठी करावी अशी आस दिग्दर्शक करण आणि यशराज बॅनरला असेल