अजय देवगनच्या 'आपला मानूस'चा टिझर, नानाचे जबरदस्त संवाद

बॉलिवूडचा सिंघम आता मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे. अजय देवगनच्या या चित्रपटामध्ये नाना पाटेकर प्रमुख भूमिकेमध्ये असणार आहेत. 'आपला मानूस' असं या चित्रपटाचं नाव आहे.

Updated: Jan 12, 2018, 05:50 PM IST
अजय देवगनच्या 'आपला मानूस'चा टिझर, नानाचे जबरदस्त संवाद title=

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम आता मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे. अजय देवगनच्या या चित्रपटामध्ये नाना पाटेकर प्रमुख भूमिकेमध्ये असणार आहेत. 'आपला मानूस' असं या चित्रपटाचं नाव आहे.

या चित्रपटाचा टिझर लॉन्च करण्यात आला आहे. नाना पाटेकर या चित्रपटामध्ये क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती नागरगोजे ही भूमिका करत आहेत. टीझरमध्ये सुरुवातीलाच एक व्यक्ती इमारतीवरून उडी मारते. या व्यक्तीच्या मृत्यूची चौकशी करताना नाना पाटेकर दिसत आहेत. अजय देवगननं ट्विटरवरून या चित्रपटाचा टिझर शेअर केला आहे.

नाना पाटेकर यांच्यासोबत सुमित राघवन आणि इरावती हर्षे या चित्रपटात दिसतील. सतिश राजवाडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ९ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.