अक्षयाने सुयशला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा....

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय सुयश टिळकने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 12, 2018, 04:49 PM IST
अक्षयाने सुयशला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.... title=

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय सुयश टिळकने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त सिनेसृष्टीतून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र एक मेसेज काही खास होता. कारण तो खास व्यक्तीने दिला होता. ती व्यक्ती म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून राणादाच्या अंजलीबाई. 

अक्षयाने शेअर केला फोटो

सुयश टिळक आणि अक्षया देवधर गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. याची त्यांनी जाहीर कबुली दिली नसली. तरी त्यांच्या सोशल साईट्सवरून ते नेहमीच एकमेकांसोबतचे फोटोज शेअर करत असतात. आताही वाढदिवसानिमित्त अक्षयाने सुयशसोबतचा फोटो शेअर करून त्याला साजेसं कॅप्शनही दिलं. 

त्यात तिने असं म्हटलं आहे की, तुझ्याशिवाय माझे अस्तित्वच नाही. तू माझ्यासाठी नेहमीच स्पेशल असशील. लव्ह यु फॉरेव्हर... असा अत्यंत रोमांटिक, काहीसा भावूक आणि सुंदर मेसेज तिने पोस्ट केला आहे.

फोटोत केमिस्टी झळकते

त्या पोस्टला अनेक लाईक्स, कमेंट्स मिळाले. त्यांचा हा फोटो देखील अतिशय सुंदर असून ते एकमेकांसोबत अत्यंत आनंदी दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी त्या दोघांनी गुपचूप साखरपूडा केल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र हे वृत्त चुकीचे असल्याचे सुयशने स्वतः सांगितले.