Akanksha Dubey Last Video: प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आकांशा दुबेने (Akanksha Dubey) बनारसमध्ये एका हॉटेल रुममध्ये (Hotel room) गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर देशभर मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. या प्रकरणात अनेक नवनवीन दावे केले जात होते. अशातच आता आकांक्षा दुबेचा मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओ (Akanksha Dubey Video) समोर आला आहे. त्यामुळे तिने जो गौप्यस्फोट केलाय, त्यामुळे आता किचकट झाल्याचं दिसून येतंय.
मृत्यूच्या 24 दिवसांनंतर आकांक्षाचा 38 सेकंदांचा एक व्हिडिओ (Akanksha Dubey Last Video) अचानक समोर आला आहे. ज्यामध्ये तिने एक्स बॉयफ्रेंड समर सिंहवर (Samar Singh) गंभीर आरोप केलेत. त्याचबरोबर तिचा एक व्हिडिओ देखील व्हायरल (Viral Video) झाल्याचं दिसतंय. ज्यामध्ये आकांक्षाच्या डोळ्यावर दुखापतीची खूण दिसत आहे, तर संपूर्ण चेहऱ्याची अवस्था वाईट दिसते.
मला माहीत नाही की माझ्याकडून काय चूक झाली, मी या जगात राहायचं नाही, असं आकांक्षा रडत रडत (Akanksha Dubey Crying) म्हणताना दिसत आहे. हा माझा तुमच्याबरोबरचा शेवटचा विषय आहे, मला काही झालं तर त्याला समर सिंह जबाबदार असेल, असं आकांक्षा तिच्या लास्ट व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे.
वाराणसी...अभिनेत्री आकांक्षा दुबे का वीडियो आया सामने
वीडियो में आकांक्षा दुबे समर पर आरोप लगा रही..मुझे कुछ भी होता है समर जिम्मेदार होगा pic.twitter.com/GiNKdvAaL7
— Gaurav Pandey (@gaurav5pandey) April 19, 2023
आकांक्षाच्या मृत्यूनंतर पोलीस समर सिंहचा शोध घेत होते. दिल्लीजवळच्या गाझियाबादमधून गुन्हे शाखेने समर सिंहला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. आता आकांक्षाचा व्हिडिओ समोर आल्याने समर सिंहचा एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचं पहायला मिळतंय. आकांक्षाची आई मधू दुबे यांनी समर सिंहवर आरोप केले होते, तेव्हापासून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली होती. तर आकांक्षा दुबे प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी देखील आकांक्षाच्या आईने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली होती.
दरम्यान, आकांक्षा दुबेची आई मधु दुबेचे वकील शशांक शेखर त्रिपाठी यांनी आकांक्षा दुबेचा फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक केला. या फोटोमध्ये आकांक्षाचा डोळा सुजलेला दिसतोय. हा व्हिडिओ कोर्टासमोर सादर करून करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय.