Akash Ambani Trolled for wearing shorts in Mandir : गेल्या अनेक दिवसांपासून तुळजाभवानी मंदिरात जाताना कसे कपडे घालावे या निर्णयावरून मोठा वाद सुरु होता. अनेकांनी या निर्णयाचा विरोध केला तर अनेकांनी हा निर्णय योग्य आहे असे म्हटले. त्यात भारतील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांच्या कुटुंबासोबत मुंबईत असलेल्या सिद्धीविनायक मंदिरात जात बाप्पाचे दर्शन घेतले. त्याचे कारण मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये असलेला क्वालिफायर 2 सामना असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, यावेळी आकाशनं मात्र, शॉर्ट्स परिधान करत बाप्पाचे दर्शन घेतल्यानं अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
संपूर्ण अंबानी कुटुंबाचा मंदिरात दर्शनाला जाताना आणि येतानाचे व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केले आहेत. या व्हिडीओत सगळ्यात आधी आकाश हा मंदिरात जाताना दिसत आहे. यावेळी आकाशनं हिरव्या रंगाचा टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाची शॉर्ट्स परिधान केली आहे. त्यानंतर चप्पल काढून आकाश त्याची पत्नी श्लोका आणि वडील मुकेश अंबानी यांची प्रतिक्षा करत थांबतो. तर त्यानं केलेल्या या कृतीचे अनेकांनी कौतुक केले आहे. मात्र, दुसरीकडे आकाश नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा शिकार झाला आहे. अनेकांनी त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा : 'स्वतःच्या सोयीनुसार वापरलं आणि...', Manasi Naik चं घटस्फोटावर वक्तव्य?
आकाश अंबानी यांचा हा व्हिडीओ पाहताच एक नेटकरी म्हणाला, 'मंदिरात शॉर्ट्स परिधान करत कोण जातं... आता तिथे असलेल्या पुजारी लोकांना त्यांचा त्रास नाही का? म्हणजे पैसेवाल्यांसाठी वेगळा हिंदू धर्म आणि आम्ही मिडलक्लास लोकांसाठी वेगळा हिंदू धर्म.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'दादा शॉर्ट्सवर मंदिरात जात नाहीत. मला एकदा वैष्णो देवीच्या मंदिरात शॉर्ट्सवर जाऊ दिलं नव्हतं.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'दादा देवाचे दर्शन घेण्यासाठी जात आहेस, नीट कपडे परिधान केले असते. इतका पण गरीब नाही.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'मी आरोप करत नाही पण कृपया ही विनंती आहे देवस्थळी शॉर्ट्स घालून जाऊ नका.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'इतके श्रीमंत आहात. मंदिरात येताना एक फूल पॅन्ट परिधान करू शकत नाही. शॉर्ट्स घालून मंदिरात आले.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'देवाचे दर्शन देखील सगळ्यात आधी श्रीमंत व्यक्तीला करायला मिळतात. गरीबांना नाही. पैश्यांवर लक्ष केंद्रित करा.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'पैसा आहे आता फक्त कप मिळाला पाहिजे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मुंबई नक्कीच मॅच जिंकणार.'