मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सिनेमांना मिळत असलेल्या अपयशामुळे चर्चेत आहे. पण आयुष्य म्हटलं तर यश - अपयशाचा सामना प्रत्येकाला करावाच लागतो. पण अक्षय त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. खिलाडी कुमार कितीही व्यस्त असला तरी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबाला (Akshay Kumar family) वेळ देत असतो. असं म्हटलं जातं की, मुलगी लवकर मोठी होती. यामुळे प्रत्येक बापाला असं वाटत असतं की, आपल्या मुलीने लहानच रहावं आपल्या मांडीवर तिने खेळावं अशी इच्छा असते. (Akshay Kumar daughter)
आपल्या मुलांच्या बाबतीत अक्षय कुमार जास्त भावूक आहे. मुलगी नितारासाठी (nitara Kumar) त्याच्या मनात अधिक प्रेम आहे. हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. अक्षयनेपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. (Akshay Kumar best day with daughter)
अक्षयने लेकीसोबत एक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केला आहे. मुलीसोबत घालवलेले काही क्षण चाहत्यांसोबत शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये, 'काल मुलीला एका अम्यूजमेंट पार्कमध्ये नेलं, तिचे गोंडस हास्य पाहून आणि सॉफ्ट टॉयज उचलून मला खऱ्या हिरो सारखं वाटत होतं...' असं लिहिलं आहे. (Akshay Kumar social media)
अक्षय कायम मुलगी नियारासोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. अक्षय कुमारचं त्याच्या कुटुंबावर किती प्रेम आहे हे तिच्या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसून येते आहे. आता अक्षयचे चाहतेही या फोटोंना लाइक करत आहेत आणि त्याला चांगला पिता म्हणत आहेत.