मोठ्या संकटाचा सामना करतोय Akshay Kumar, म्हणाला, 'Kapil Sharmaमुळेच माझे पैसे आणि...

..नंतर कपिलला असं काही सुनावलं कि सर्वांनाच धक्का बसलाय..

Updated: Sep 4, 2022, 01:13 PM IST
मोठ्या संकटाचा सामना करतोय Akshay Kumar, म्हणाला, 'Kapil Sharmaमुळेच माझे पैसे आणि... title=

AKSHAY KUMAR BLAMES KAPIL SHARMA FOR FILMS GOT FLOP: कॉमेडियन कपिल शर्मा (KAPIL SHARMA) लवकरच आपला शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे  काही दिवसांपूर्वी  कपिलच्या नवीन शोचा एक प्रोमो सुद्धा समोर आला होता.

आणि प्रेक्षकांना हा प्रोमो खूप आवडला होता. कपिलच्या नवीन शोचं शूटिंग सध्या खूप जोरदार सुरु आहे . 

कपिल शर्माच्या नवीन शोमध्ये खिलाडी अक्षय कुमार दिसणार आहे. 2022 हे वर्ष अक्षय कुमार साठी म्हणावा तितकं चांगलं नव्हत.

नुकतंच अक्षयचा कठपुतली(KATHPUTLI) सिनेमा OTTवर रिलीझ झालाय. मात्र या सिनेमाला सुद्धा म्हणावा तसा रिस्पॉन्स मिळाला नाही.

या आधी  'बच्चन पांडे', 'सम्राट पृथ्वीराज' आणि  'रक्षा बंधन' हे तिन्ही सिनेमे चांगलेच आपटले होते.

कपिलच्या शो मध्ये आल्यानंतर कपिल ला असं काही सुनावलं कि सर्वानाच धक्का बसलाय. समोर आलेल्या नवीन प्रोमो मध्ये कपिल आणि अक्षय मधला हा संवाद दाखवण्यात आला आहे.

यावेळी कपिल म्हणतो कि ''अक्षय दर वाढदिवशी एक वर्षाने लहान कसा होतोस ? '' यावर अक्षय लगेच उत्तर देतो ''या माणसाची नजर खूप वाईट आहे ,

सर्व गोष्टींवर नजर लावत असतो माझे पैसे माझे सिनेमे सर्वांवर नजर लावतो म्हणून बघा आता माझे सिनेमेसुद्धा चालत नाहीत.  अक्षय कुमार ने हे सर्व मस्तीमध्ये बोलल्यामुळे लगेचच कपिल शर्मा आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिटला.. 

लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटिस  येईल आणि मनोरंजन करेल यात वादच नाही