Video : हे घर आहे की राजमहल... खिलाडी Akshay Kumar चं रॉयल घर

Akshay Kumar च्या घराचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. 

Updated: Dec 8, 2022, 06:40 PM IST
Video : हे घर आहे की राजमहल... खिलाडी Akshay Kumar चं रॉयल घर title=

Akshay Kumar Royal House : बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षय हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अक्षय बऱ्याचवेळा त्याच्या कुटुंबासोबत वेळ व्यथित करताना दिसतो. बऱ्याच वेळा त्याच्या घरातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. अक्षयच्या चाहत्यांना त्याच आलिशान घर आतून कसं असेल असे प्रश्न पडले आहेत. त्या सगळ्यांना अक्षयचं घर पाहायचं आहे. दरम्यान, अक्षयनं नुकतंच त्याच्या घराच्या टूरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

अक्षयनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अक्षयनं त्याचा लिव्हिंग रुम आणि ड्रेसिंग रुम दाखवलं आहे. अक्षयच्या घरातील वॉल पेंटिंग्स, लग्झरी काऊच आणि घरातील इतर काही गोष्टी त्याच्या घराला आकर्षक दिसत आहेत. हा व्हिडीओ खरंतर अक्षयच्या एका मुलाखतीतील आहे. अक्षयचा जुहू येथे समुद्रकिनारी हा बंगला आहे. त्याच्या या बंगल्याची किंमत जवळपास 80 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. 

पाहा व्हिडीओ -

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अक्षयनं पहिल्यांदाच त्याच्या घरी मुलाखत दिली आहे. ही मुलाखत देखील त्याच्या नव्या कपड्यांच्या ब्रँडच्या लॉंच निमित्तानं घेतली होती. व्हिडीओच्या सुरुवातीला अक्षय घराच्या गार्डनमध्ये असून त्यानं निळ्या रंगाचं स्वेट शर्ट आणि ट्रॅक परिधान केल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत अक्षयनं तो नेहमी ट्रॅक पँट, हूडी आणि टी-शर्ट घालून रहात असल्याचे सांगितले आहे. (akshay kumar luxury house how it looks from inside watch the viral video) 

हेही वाचा : Sushant Singh Rajput च्या निधनाच्या 2 वर्षांनंतर रिया चक्रवर्ती पुन्हा रिलेशनशिपमध्ये? कोण आहे नवीन बॉयफ्रेंड

दरम्यान, अक्षय कुमार हा लवकरच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील त्याचा लूक नुकताच समोर आला असून त्यावर नेटकऱ्यांच्या मिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी त्याच्या लूकचे कौतूक केले आहे तर काही नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली आहे.