क्रिती सेनॉनच्या बहिणीने KISS करताना अक्षय कुमारला दिला धोका, पाहा व्हिडिओ

चित्रपट असो कि मग रिअल लाईफ, अक्षय कुमार धमाल करायला कधीच चुकत नाही.

Updated: Jul 10, 2021, 07:10 PM IST
क्रिती सेनॉनच्या बहिणीने KISS करताना अक्षय कुमारला दिला धोका, पाहा व्हिडिओ title=

मुंबई : चित्रपट असो कि मग रिअल लाईफ, अक्षय कुमार धमाल करायला कधीच चुकत नाही. अलीकडेच त्याचं 'फिलहाल 2' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात कृती सेनॉनची बहीण नुपूर सेनॉन त्याच्यासोबत आहे. प्रेक्षकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. आता अक्षयने या गाण्याच्या व्हिडिओवर एक इंस्टाग्राम रिल्स शेअर केलं आहे. मात्र अक्षयने या व्हिडिओमध्ये  फनी ट्विस्ट देवून हा व्हिडिओ मजेदार बनवला आहे. अक्षयने #filhaal 2 या नावाने हे रील्स चॅलेंज स्विकारुन इन्स्टाग्राम रील तयार केलं आहे.

मजेदार व्हिडिओ
अक्षय कुमारने सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे जो खूप मजेदार आहे. व्हिडिओच्या सुरुवातीस अक्षय नुपूर सॅनॉनकडे रोमँन्टिक सीन द्यायला जातो मात्र जेव्हा अक्षय डोळे उघडतो तेव्हा त्याला त्याच्यासमोर भूमी पेडणेकर दिसते. हे पाहून अक्षय आश्यर्यचकित होतो. हा व्हिडिओ शेअर करत अक्षयने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, '#फिलहाल 2reels कॉन्टेस्टमध्ये भूमी पेडणेकर आणि नुपूर सेनॉन यांची मजेदार एन्ट्री झाली. आता तुमची पाळी... लक्षात ठेवा काहीतरी नवीन करा'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

YouTubeवर व्हिडिओ ट्रेंडिंग
अक्षय कुमार नुपूर सॅनॉनचा हा व्हिडिओ 'फिलहाल'चा सिक्वल आहे. हे गाणं बी प्राक यांनी गायलं आहे. 6 जुलै रोजी रिलीज झालेलं हे गाणं यूट्यूबवर अजूनही ट्रेंड होत आहे. लवकरच अक्षय कुमार 'बेलबॉटम', 'सूर्यवंशी', 'अतरंगी रे', 'पृथ्वीराज', 'बच्चन पांडे' आणि 'राम सेतु' या सिनेमात दिसणार आहे