अक्षय कुमारने उचललं मोठं पाऊल, इतर बॉलिवूड कलाकारांना होऊ शकतो त्रास

बॉलीवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करत नाहीत आणि एकापाठोपाठ एक पडत आहेत.  

Updated: Aug 25, 2022, 10:56 PM IST
अक्षय कुमारने उचललं मोठं पाऊल, इतर बॉलिवूड कलाकारांना होऊ शकतो त्रास  title=

मुंबई : बॉलीवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करत नाहीत आणि एकापाठोपाठ एक पडत आहेत. अक्षय कुमारही या ट्रेंडला बळी पडला आहे. परिणामी त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. आगामी चित्रपटांमध्ये त्याने आपली फी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एका चित्रपटासाठी 75 कोटी घेणारा अक्षय आता फक्त 9 ते 18 कोटी घेणार आहे.

पण ज्या चित्रपटांचा तो निर्माता नसेल, त्यांच्या नफ्यात तो ५० टक्के वाटेकरी असेल. अक्षय ज्या चित्रपटांचा निर्माता आहे त्यातील 80 ते 85 टक्के नफा तो घेतो. यामुळेच पॅडमॅनसारख्या छोट्या बजेटच्या चित्रपटाने ६० कोटींची कमाई केली असली तरी अक्षयला त्याचा मोठा फायदा झाला.

अक्षय पुढे काय करणार?
अलीकडेच अक्षय म्हणाला होता की, त्याचे चित्रपट फ्लॉप होण्याची जबाबदारी तो स्वत: घेतो. चित्रपट पडल्यावर निर्मात्यांना त्याचा खूप त्रास होतो. रक्षाबंधन फ्लॉप झाल्यानंतर त्याने स्पष्टपणे सांगितलं की, माझे चित्रपट फ्लॉप होत असतील तर याला कुठेतरी मीही जबाबदार आहे. या सर्व बाबी पाहता त्याने कमी फी घेण्याचा निर्णय घेतल्याचं चित्रपटसृष्टीत बोललं जात आहे.

ट्रेडनुसार अक्षयने प्रत्यक्षात आमिर खानची पद्धत अवलंबली आहे. आमिर चित्रपटात त्याची फी कमी ठेवतो. पण चित्रपटात त्याचा मोठा वाटा आहे. यामुळेच आमिरने दिल चाहता है आणि धूम 3 मधून भरपूर कमाई केली कारण ते हिट चित्रपट होते.

अक्षय कुमारने चित्रपट फ्लॉपची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आणि फी कमी केल्यानंतर आता निर्मात्यांच्या नजरा इतर स्टार्सवर लागल्या आहेत. तसं, अनेक निर्मात्यांनी स्टार्सनी त्यांची फी कमी करावी अशी मागणी करायला सुरुवात केली आहे. स्टार्सची फी इतकी जास्त आहे की पन्नास ते साठ टक्के चित्रपट त्यातच जातो.

या स्टार्सच्या फीमुळे चित्रपटांचं बजेटही खूप वाढलं आहे. अक्षयच्या फी कपातीच्या बातमीचा परिणाम इतर स्टार्सवरही होणार हे निश्चित. भलेही त्यांना त्यांची फी कमी करणं आवडत नसले तरी रिंगणात राहण्यासाठी त्यांना त्यांच्या फीच्या अटी बदलाव्या लागतील. निर्मात्यांना सहकार्य करावं लागेल. त्यालाही चित्रपट फ्लॉप झाल्याची जबाबदारी उचलावी लागणार आहे. तोट्यात सहभागी व्हावं लागेल.