सिनेसृष्टीत शोककळा! बॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन

'नौनिहाल' हा त्यांचा चित्रपट निर्माता म्हणून पहिला चित्रपट होता.

Updated: Aug 25, 2022, 10:51 PM IST
सिनेसृष्टीत शोककळा! बॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन  title=

Director Saavan Kumar Tak Passes Away: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक, गीतकार आणि निर्माते सावन कुमार यांचे मुंबईत निधन झाले. सावन कुमार टाक यांचे हृदयविकाराचा झटक्याने आणि अनेक अवयव निकामी झाल्यामुळे निधन झाले. सावन कुमार वयाच्या 86 व्या वर्षी फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना बराच वेळ ताप होता. काही दिवसांपूर्वी त्यांना न्यूमोनिया झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

चार दशके चित्रपटसृष्टीवर राज्य
सावन कुमार टाक यांनी चार दशके हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक, निर्माता आणि गीतकार म्हणून काम केले आहे. मीना कुमारी ते सलमान खान यांसारख्या लोकप्रिय स्टार्ससोबत त्यांनी काम आहे. आपल्या करिअरमध्ये त्यांनी मीना कुमारीपासून ते सलमान खानसोबत काम केले आहे. 'नौनिहाल' हा त्यांचा चित्रपट निर्माता म्हणून पहिला चित्रपट होता.

मीना कुमारीसोबतचा चित्रपट हिट
सावन कुमार टाक यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ काम केले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारीसोबत त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. 'गोमती किनरे' हा चित्रपट 1972 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट त्यावेळचा सर्वात मोठा हिट ठरला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सलमान खानही भावुक 
सावन कुमार टाक यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. या यादीत सलमान खानसह राजेश खन्ना, जितेंद्र, श्रीदेवी, जया प्रदा यांचा समावेश आहे. सावन कुमार यांनी स्त्रीप्रधान चित्रपटांची जास्त निर्मिती केली.