दैव बलवत्तर! काळ आला होता, पण वेळ आली नव्हती... असाच एक प्रकार व्हिडीओत घडला आहे. तामिळनाडूच्या पदुकोट्टईमध्ये हा प्रकार घडला आहे. हा चमत्कारीक घटनेने सगळ्यांना हैराण केले आहे. एका व्यक्तीसोबत हा प्रकार घडला आहे. एक व्यक्ती अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आला आहे. ज्याच्या परमेश्वराची कृपादृष्टी आहे त्याच्यासोबच काहीच होत नाही हेच विधान अधोरेखित करणारी घटना घडली आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रस्त्यावर एक बस भरधाव वेगाने येत होती आणि एक व्यक्ती तिच्या बाजूने चालत होती. बस त्याच्या जवळ येताच त्याला बसची धडक लागू नये म्हणून तो रस्त्याच्या कडेला धावू लागतो. मात्र, यादरम्यान मुलगा दोन बसमध्ये अडकून पडला. बस त्याच्यावरून जाते, पण विचित्र गोष्ट म्हणजे तो मुलगा पूर्णपणे सुरक्षित राहतो आणि बस गेल्यावर लगेच उभा राहतो. या घटनेत त्याला कोणतीही दुखापत झाली नाही, ही एक चमत्कारिक घटना मानता येईल. या घटनेनंतर लोक म्हणतात की, काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. एका युझरने लिहिले की, "ही घटना केवळ नशीब किंवा चमत्कार नव्हती, तर एक प्रकारची अनपेक्षित मदत होती." युझरने लिहिले, "थोडक्यासाठी वाचला."हा व्हिडिओ त्यांच्यासाठी एक संदेश आहे ज्यांना वाटते की आयुष्यात काहीही होऊ शकते आणि कोणताही विचित्र आणि अशक्य मार्ग कधीही समोर येऊ शकतो. ज्याद्वारे आपण आपला जीव वाचवू शकतो. हे आपल्याला हे देखील शिकवते की आपण आपल्या सुरक्षिततेबद्दल सावध असले पाहिजे, कारण कधीही अनपेक्षित काहीतरी घडू शकते.