आलिया-रणबीरचा किसींग फोटो पाहून चाहत्यांना बसतोय धक्का

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट खूप दिवसांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.

Updated: Aug 20, 2021, 04:08 PM IST
आलिया-रणबीरचा किसींग फोटो पाहून चाहत्यांना बसतोय धक्का title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट खूप दिवसांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनीही आपलं प्रेम उघडपणे व्यक्त केलं आहे, मात्र चाहते दोघांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. जे काही ना काही कारणाने आत्तापर्यंत पुढे ढकलण्यात आलं आहे. जरी दोघे क्वचितच एकत्र दिसले असले तरी, नेहमीच अचानक हे दोघं अनेकदा सपॉट होतात. असतो जेव्हा आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकत्र दिसतात.

आलिया-रणबीरचा फोटो आला समोर 
अलीकडेच सोशल मीडियावर दोघांचा एक फोटो समोर आला आहे, जो पाहताच व्हायरल झाला आहे. हा फोटो आलिया भट्टची स्टायलिस्ट लक्ष्मी लहारने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा एक साधा फोटो आहे ज्यात आलिया भट्ट आरामशीर पोशाखात दिसत आहे. जर तुम्ही शेअर केलेला हा फोटो पाहिला तर तुम्हाला तुमच्या पहिल्या नजरेत काहीच कळणार नाही. पण हा फोटो तुम्ही निरखून पाहिलात तर तुम्हाला आलिया आणि रणवीरचा क्यूट फोटो दिसेल. जो या फोटोच्या मागच्या वॉलवर आहे.

आलिया-रणबीर दिसले एकत्र फोटोत
भिंतीवर एक फोटोफ्रेम दिसत आहे ज्यात कोणीतरी तिला आलिया भट्टच्या डोक्यावर किस करत आहे. बारकाईने पाहिलं तर समजतं की ही व्यक्ती दुसरी कोणी नाही तर बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ब्रह्मास्त्रात दिसतील एकत्र 
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच ब्रह्मास्त्र चित्रपटात दिसणार आहेत. ज्येष्ठ चित्रपट निर्माते अयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा पहिला चित्रपट असेल ज्यात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाची कथा तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दोन्ही कलाकारांचा लूक अद्याप समोर आलेला नाही.