'येऊ कशी तशी मी नांदायला'मध्ये लग्नसमारंभांची सुरुवात; समोर आले संगीत सोहळ्यातील फोटो

मालविकाचा दिसला अनोखा अंदाज, पाहून तुम्हालाही बसेल धक्का....  

Updated: Aug 20, 2021, 04:00 PM IST
'येऊ कशी तशी मी नांदायला'मध्ये लग्नसमारंभांची सुरुवात; समोर आले संगीत सोहळ्यातील फोटो  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : झी मराठी वाहिनीवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'येऊ कशी तशी मी नांदायला' (yeu kashi tashi mi nandayla) या मालिकेला प्रेक्षकांनी कमालीची पसंती दिली. फार कमी काळातच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या या मालिकेला आता एक अत्यंत रंजक वळण मिळालं आहे. हे वळण म्हणजे ओम आणि स्वीटूच्या लग्नाचं. 

बऱ्याच अडचणी आणि अडथळे दूर करत, कुटुंबीयांची मनधरणी करत ओम आणि स्वीटू अखेर लग्नबंधनात अडकण्यास सज्ज आहेत. पण, त्याआधी संगीत, मेहंदी, हळद अशा अनेक समारंभांची रेलचेल या मालिकेच्या सेटवर पाहायला मिळत आहे. 

नुकतेच मालिकेच्या नव्या भागातील फोटो झी मराठीकडून सोशल मीडियारव पोस्ट करण्यात आले आहेत. या पोस्टमध्ये ओम आणि स्वीटूच्या संगीत सोहळ्याची रंगत पाहायला मिळत आहे. तर, ओमची बहीण मालविका हिची अवस्था पाहून प्रेक्षकांना धक्काही बसत आहे. 

सध्या या फोटोंना अनेक लाईक्स आणि शेअर्स मिळाले असून, चाहत्यांनी या जोडीला त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ओम आणि स्वीटू ही काल्पनिक पात्र असली तरीही या मालिकेशी आणि त्यातीच पात्रांशी प्रेक्षकांनं आपलेपणाचं नातं यातून व्यक्त होत आहे.