Baby Shower च्या निमित्तानं Alia ची नौटंकी सुरू? Video Viral होताच ट्रोलर्सचा आलियावर निशाणा

सोशल मीडियावर सध्या फक्त ब्रम्हास्त्र याच चित्रपटाची क्रेझ आहे. 

Updated: Sep 15, 2022, 02:16 PM IST
Baby Shower च्या निमित्तानं Alia ची नौटंकी सुरू? Video Viral होताच ट्रोलर्सचा आलियावर निशाणा  title=

Alia Bhatt Video: आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा (Alia Bhatt and Ranbir Kapoor) 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट (Bramhastra Movie) नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तर काहींना हा चित्रपट फारसा रूचलेला नाही. अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटाला आणि चित्रपटातील आलियाच्या रोलला ट्रोलही (Alia Bhatt gets Trolled) केले आहे. सोशल मीडियावर सध्या फक्त 'ब्रह्मास्त्र' याच चित्रपटाची क्रेझ आहे. (alia Bhatt baby shower video goes viral on instagram trollers trolls her on baby shower news netizens reacts)

आलिया आणि रणबीर लवकरच त्यांंच्या बाळाचे (Alia Bhatt and Ranbir Kapoor Baby) स्वागत करणार आहेत. या प्रसंगी आलियाचे डोहाळे जेवण करण्यासाठी आलियाच्या सासूबाई नीतू कपूर (Neetu Kapoor) फार उत्सुक आहेत. परंतु आलियाचं डोहाळे जेवणं कुठे होणार? तिच्या डोहाळे जेवणाला नक्की कोणा कोणाचं निमंत्रण असणार? याबाबत अद्याप गुप्तता पाळलेली दिसते. पण नुकताच आलियाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात आलिया आपल्या डोहाळे जेवणाबद्दल बोलताना दिसते आहे. 

परंतु ट्रोलर्सनी मात्र आलियाला चांगलंच ट्रार्गेट केलं आहे. एका ट्रोलर लिहिलंय की, ''आता बेबी शॉवरच्या निमित्तानं आलियाची नौटंकी सुरू होईल...'' त्यासोबत दुसऱ्या एका ट्रोलर लिहिलंय की, ''लग्नाला 5 महिने पण झाले नाहीत आणि लगेचच डोहाळे जेवण?'' असा सवालही नेटकऱ्यांनी उठवला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आलिया ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

समोर आलेल्या माहितीनुसार आलियाचं डोहाळे जेवण आई (Alia Bhatt Mother Soni Razdan) सोनी रजदान आणि सासूबाई नीतू कपूर खास पद्धतीनं करणार असल्याचं समोर आलं आहे. त्यासाठी पाहूण्यांची यादीही तयार झाली असल्याचं बोललं गेलं आहे. समोर आलेल्या या व्हिडीओत आलियाला छायाचित्रकार विचारतात की तिचं डोहाळं जेवण कधी होणार त्यावर आलिया हसते आणि त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते.