रणबीरसाठी आलियाकडून खास गोष्ट, फोटो पाहून आश्चर्याचा धक्का बसेल

अभिनेत्री आलिया भट्टने नुकताच तिच्या यूट्यूब चॅनलवर एक ब्लॉग पोस्ट केला आहे.

Updated: Nov 14, 2021, 03:29 PM IST
रणबीरसाठी आलियाकडून खास गोष्ट, फोटो पाहून आश्चर्याचा धक्का बसेल title=

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टने नुकताच तिच्या यूट्यूब चॅनलवर एक ब्लॉग पोस्ट केला आहे. या ब्लॉगमध्ये आलियाने तिच्या रोजच्या आयुष्याशी संबधित काही अतिशय मनोरंजक गोष्टी लोकांसमोर ठेवल्या आहेत. आलियाने तिच्या ब्लॉगमध्ये सांगितलंय की, ती एका जाहिरातीसाठी शूट करणार आहे. 

आलिया तिची बेस्ट फ्रेंड आकांशा रंजन कपूरसोबत या जाहिरातीचं शूटिंग करत होती. त्याचबरोबर या ब्लॉगमध्ये आलिया तिच्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही देताना दिसत आहे. आलियाला चाहत्यांनी विचारलं की, तिच्या मोबाईलचा वॉल पेपर काय आहे? या प्रश्नाला उत्तर देताना आलियाने मोबाईलकडे कॅमेरा वळवला. 

आलियाच्या मोबाईल वॉल पेपरमध्ये ती तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत दिसत आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकमेकांसोबत सिरीअस रिलेशनशिपमध्ये आहेत.  अलीकडेच रणबीरच्या वाढदिवसानिमित्त आलियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये रणबीर आणि आलिया एकत्र बसलेले दिसत होते. बातमीनुसार, रणबीर आणि आलिया जोधपूरला गेले होते. तेव्हा हा फोटो काढण्यात आला होता.

आलियाने या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'हॅपी बर्थडे माय लाइफ'. मात्र, रणबीर कपूरने गेल्या वर्षी एका मुलाखतीदरम्यान आलिया त्याची गर्लफ्रेंड असल्याचंही कबूल केलं होतं. रणबीर म्हणाला होता की, जर देशात लॉकडाऊन नसतं तर आतापर्यंत त्यांच आणि आलियाचं लग्न झालं असतं. जर वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, रणबीर आणि आलिया चित्रपट निर्माता अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.