मैत्रिणीच्या लग्नात आलिया भटचे ठुमके

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट रविवारी आपल्या मैत्रिणीच्या लग्नासाठी जोधपूरला गेली होती. येथील काही व्हिडीओ आणि फोटोज व्हायरल होतायत. 

Updated: Jan 22, 2018, 12:17 PM IST
मैत्रिणीच्या लग्नात आलिया भटचे ठुमके title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट रविवारी आपल्या मैत्रिणीच्या लग्नासाठी जोधपूरला गेली होती. येथील काही व्हिडीओ आणि फोटोज व्हायरल होतायत. 

जोधपूरमध्ये आलियाची कॉलेज फ्रेंड कृपा मेहदा हिचे लग्न होते. यावेळी आपल्या मैत्रिणीच्या लग्नात आलियाने हजेरी लावली होती. यावेळी आलियाने हे लग्न फुल ऑन एन्जॉय केले. 

आलियाचा ठुमके लगावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात आलियाने हवा-हवाई या गाण्यावर डान्स केलाय. यात व्हिडीओत आलिया या गाण्यावर मजा मस्ती करताना दिसतेय. 

आलिया सध्या रणवीर सिंह सोबत गली ब्वॉय या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची सेटवरील त्यांचे फोटो शेअर झाले होते. याशिवाय ती लवकरच करण जोहरच्या ब्रम्हास्त्र या सिनेमाची शूटिंग सुरु करणार आहे. यात आलियासह रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चनही दिसणार आहेत. हा सिनेमा २०१९मध्ये रिलीज होणार आहे.