आलियाने प्रेग्नंन्सीनंतर आता दिली 'ही' गुड न्यूज, तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

सध्या ते दोघं जिथे कुठे स्पॉट होतायत तिथे तिथे मीडिया त्यांच्यामागे धावते आहे.

Updated: Jul 23, 2022, 12:53 PM IST
 आलियाने प्रेग्नंन्सीनंतर आता दिली 'ही' गुड न्यूज, तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव title=

मुंबईः आलिया आणि रणबीरने नूकतीच आपल्या बाळाची गुडन्यूज सोशल मीडियावर शेअर केली आहे. सध्या ते दोघं जिथे कुठे स्पॉट होतायत तिथे तिथे मीडिया त्यांच्यामागे धावते आहे. मध्यंतरी आलिया भट्ट एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. तेव्हा तिचे बेबी बम्प दिसत असल्याने तिच्या अवतीभोवती चाहत्यांचा नुसता गराडा होता. आलिया नुकतीच लंडनवरून आपल्या आगामी आणि पहिल्या हॉलीवूड चित्रपटाचे शुटिंग संपवून भारतात परतली आहे. तेव्हा आता रणबीर आणि आलिया आपल्या या गुडन्यूज नंतर कधी एकत्र स्पॉट होतायत याबद्दलही चाहत्यांना आतूरता आहे. 

रणबीरचा नुकताच 'शमशेरा' हा चित्रपट रिलिज झाला आहे. त्यापुर्वी आलियानेही एक पोस्ट शेअर करत चाहत्यांची संवाद साधला आहे. तिने केलेल्या पोस्टमध्ये It's Kapoor's Day!!! अशं कॅप्शन दिले आहे. त्यात तिने 'कपूर' असं लिहिलेला ग्राफिक्सचा शर्ट घातला आहे आणि त्या पोस्टमधून तिनं चाहत्यांना 'शमशेरा' चित्रपट पाहण्याचे आव्हान करत तिचा आनंद शेअर केला आहे. या पोस्टवर आलियाच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

रणबीर आणि आलियाने याच महिन्यात आपल्या बाळाची गुडन्यूज दिली आहे. त्यामुळे चाहते भलतेच उत्सुक आहे. 'शमशेरा' चित्रपटाला बॉक्स ऑफिस फारसा चांगला प्रतिसाद मिळत नसून हा चित्रपट जगभर रिलिज झाला आहे. तीन ते चार हजारहून अधिक स्क्रिन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तरीसुद्धा या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूपच थंड प्रतिसाद दिला आहे. 'शमशेरा'चे कास्टिंग, विषय आणि प्रमोशन पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकेल असे चित्र होते परंतु वास्तवात मात्र चित्र पालटले आहे. 

रणबीर कपूरने तब्बल चार वर्षांनंतर बीग स्क्रिनवर कमबॅक केले आहे. त्याचा 'ब्रम्हास्त्र' हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिनेते संजय दत्त यांचा बायोपिक रणबीरने केला होता त्यानंतर तो आता 'शमशेरा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.