मुंबई : देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सर्वत्र लसीकरण मोहिम राबवली जात आहे. तर दुसरीकडे सध्या देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येमुळे सर्वच नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. दरम्यान आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी कोरोना कोरोना व्हायरस बद्दल चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सल्ला दिला आहे.
When it’s really the 16 to 40 age group that’s ‘socialising’ going out to work, bars, nightclubs etc (the last 2 without masks mostly) just can’t understand why they aren’t getting the vaccine first @uddhavthackeray @AUThackeray
— Soni Razdan (@Soni_Razdan) March 24, 2021
राजदान यांनी 16 ते 40 वयोगटातील लोकांना प्रथम कोरोना लस देण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला. त्या ट्विट करत म्हणाल्या,'16 ते 40 वयोगटातील लोक कामासाठी घराबाहेर पडतात. नोकरी, बार, क्लब अशा ठिकाणी देखील या वयोगटातील लोक जातात. तर त्यांना लस का दिली जात नाही?' असा प्रश्न राजदान यांनी व्यक्त केला.
सध्या भारतात ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे. अशात सोनी राजदान यांनी त्यांचे विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले. त्यामुळे त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोनी राजदान यांनी दुरदर्शन वाहिनीवरील 'बुनियाद' मालिकेत महत्त्वाची भुमिका बजावली. त्याचप्रमाणे त्यांनी बॉलिवूड मधील अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे.