अल्लू अर्जुन बनला देशातील सर्वात महागडा अभिनेता, थलपती विजयला टाकलं मागे, 'पुष्पा 2' साठी घेतली इतकी रक्कम

थलपती विजयला मागे टाकून अल्लू अर्जुन बनला देशातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता. 'पुष्पा 2' चित्रपटासाठी घेतली सर्वात जास्त फी. जाणून घ्या सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 29, 2024, 04:49 PM IST
अल्लू अर्जुन बनला देशातील सर्वात महागडा अभिनेता, थलपती विजयला टाकलं मागे, 'पुष्पा 2' साठी घेतली इतकी रक्कम

Allu Arjun Highest Paid Actor: साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. हा चित्रपट 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, आता निर्मात्यांनी या चित्रपटाची डेट बदलून 5 डिसेंबर केली आहे. अनेक दिवसांपासून चाहते 'पुष्पा 2' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

दरम्यान, थलपती विजयला मागे टाकून अभिनेता अल्लू अर्जुन हा देशातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.  अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा चित्रपट या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. 'पुष्पा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर आता सर्वजण अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाची वाट पाहत आहेत. 

अल्लू अर्जुनने 'पुष्पा 2' साठी घेतली इतकी रक्कम

'पुष्पा 2' चित्रपटात अल्लू अर्जुन पुन्हा एकदा पुष्पा राजच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासोबत या चित्रपटात रश्मिका मंदाना देखील दिसणार आहे. 'पुष्पा 2' या चित्रपटाने रिलीजपूर्वीच मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. आतापर्यंत 'पुष्पा 2' चित्रपटाने 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. यासोबतच या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड देखील मोडले आहेत. अशातच आता या चित्रपटाबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, अल्लू अर्जुनच्या आगामी 'पुष्पा 2' चित्रपटातील फीबाबत. 

Track Tollywood च्या रिपोर्टनुसार, अभिनेता अल्लू अर्जुनने 'पुष्पा 2' चित्रपटासाठी 300 कोटी रुपये फी घेतली असल्याचं म्हटलं जात आहे. यासह तो देशातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता देखील ठरला आहे. अल्लू अर्जुनने थलपती विजयला मागे टाकून हा नवीन रेकॉर्ड केला आहे. 

'थलपथी 69' साठी विजयला 275 कोटी रुपये फी

यापूर्वी 'थलपथी 69' साठी विजयला 275 कोटी रुपये फी देण्यात आली असल्याचं सांगण्यात आले होते. त्यावेळी शाहरुख खानला मागे टाकून विजय हा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला होता. मात्र, आता देशातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता अल्लू अर्जुन ठरला आहे. अल्लू अर्जुनने 'पुष्पा 2' साठी 300 कोटी रुपये मानधन घेऊन विजयचा रेकॉर्ड मोडला आहे. परंतु 'पुष्पा 2'  चित्रपटाच्या निर्मात्यांनी अल्लू अर्जुनच्या फीबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. 

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More